AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ अडचणीत! चेंबुर पोलीस ठाण्यात भुजबळांविरोधात का दाखल झाला गुन्हा?

छगन भुजबळांविरोधात चेंबुर पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

छगन भुजबळ अडचणीत! चेंबुर पोलीस ठाण्यात भुजबळांविरोधात का दाखल झाला गुन्हा?
भुजबळांविरोधात गुन्हा Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 9:11 AM

कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांविरोधात (Chagan Bhujbal Latest News) चेंबुर पोलिसांत (Chembur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील चेंबुरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी (Lalit Kumar Tekchandani) यांच्या तक्रारीनंतर भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुजबळ यांच्यासोबतच अन्य दोघांवरही टेकचंदानी यांनी तक्रारीत आरोप केलाय. फोन आणि मेसेजद्वारे धमकी दिल्याचा आरोप उद्योगपती टेकचंदानी यांनी भुजबळांवर केलाय.

मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी यांनी पोलीस तक्रारीत केला आहे. छगन भुजबळ यांचे दोन व्हिडीओ ललितकुमार यांनी फॉरवर्ड केले होते. हिंदू धर्माविरोधात भुजबळांची भाष्य केल्याचा दावा करत हे व्हिडीओ फॉरवर्ड करण्यात आले होते. त्यामुळे आपल्याला धमकी देण्यात आल्याचा आरोप ललितकुमार यांनी केलाय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

चेंबुर पोलिसांनी ललितकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवून घेतला आहे. कलम 506 अन्वये छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघा जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी चेंबुर पोलीस पुढील तपास करत आहेत.

छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीची शाळेत पुजा करण्यावरुन केलेलं एक विधान चर्चेत आलंय. शाळेत देवी सरस्वतीची पुजा का करावी? त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांची पुजा का करु नये? देवी सरस्वती मातेनं फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं, असं म्हटलं होतं. या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला होता.

दरम्यान, आपल्या वक्तव्यानंतर झालेल्या वादानंतरही आपल आपल्या विधानावर ठाम आहोत, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली होती. दरम्यान, आता छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबुर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. चेंबुर पोलिस आता याप्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.