Mayor Election | ‘या’ राज्यात महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने आप-काँग्रेसला दिला मोठा झटका
Mayor Election | काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला फुटीच ग्रहण लागलेलं असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने आप आणि काँग्रेसला पराभूत केलं आहे.
नवी दिल्ली : भाजपाने एका महत्त्वाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसला झटका दिला आहे. दिल्लीप्रमाणे आम आदमी पार्टीच पंजाबमध्ये सरकार आहे. चंदीगडमध्ये मंगळवारी महापौरपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपान आपच्या कुलदीप कुमार यांचा पराभव केला. भाजपाला 16 मत मिळाली. इंडिया आघाडीला 12 मत मिळाली. 8 मत रद्द झाली. जी मतं रद्द झाली, ती आप आणि काँग्रेसची मत आहेत. इंडिया आघाडीकडे 20 संख्या होती. त्यांना फक्त 12 मत मिळाली. 8 मत रद्द झाली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा आरोप आहे की, प्रेसिडिंग ऑफिसरने मतमोजणी दरम्यान एजेंटला पुढे येऊ दिलं नाही. त्यानंतर पेनाने काहीतरी मार्किंग केलं, त्यानंतर मत रद्द झाली.
भाजपाने प्रेसिडिंग ऑफिसरला हाताशी धरुन घोटाळा केला, असा आरोप आप आणि काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. प्रेजेंटिंग ऑफिसरने बॅलेट बॉक्स ओपन केला, तेव्हा इंडिया आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवाराच्या एजंटला पुढे येऊ दिलं नाही. त्यामुळे मतांशी छेडछाड झाली व ती मत रद्द झाली, असा आप आणि काँग्रेसचा आरोप आहे.
लोकसभा निवडणुकीआधी पहिली लढाई
लोकसभा निवडणुकीआधी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये ही पहिली लढाई होती. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात ही निवडणूक झाली. चंदीगड नगर पालिकेच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय बॅरिकेड लावण्यात आले होते. नगर पालिका इमारतीच्या आसपास ट्रिपल लेयर सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला होता. निवडणुकीच्यावेळी 800 जवान तैनात होते. चंदीगड पोलिसांचे 600 जवान, ITBP आणि रॅपिड एक्शन फोर्सचे जवान तैनात होते.