चंद्राबाबू नायडू भेटीसाठी शरद पवारांच्या घरी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालापूर्वी राजकीय भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी […]

चंद्राबाबू नायडू भेटीसाठी शरद पवारांच्या घरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालापूर्वी राजकीय भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली.चंद्राबाबूंच्या या भेटीगाठी म्हणजे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीने विशेष राज्याच्या दर्जावरुन भाजपसोबत एनडीएतून फारकत घेतली. सध्या ते यूपीएच्या नेत्यांसोबत दिसतात.

दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशातील सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती यांच्याही भेट  घेणार आहेत.  चंद्राबाबू नायडू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर लखनऊकडे रवाना झाले. तिथे ते मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत.

लोकसभा निकालादिवशी म्हणजेच 23 मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. एकंदरीत ही सर्व स्थिती पाहता विरोधकांनी निकालापूर्वीच सत्तास्थापनेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केल्याचं चित्र आहे.

पुन्हा मोदी सरकार : अमित शाह

दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केला. अमित शाह यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत पाहायला मिळाले. मोदींनी आपलं मत व्यक्त केलं मात्र सर्व प्रश्नांना अमित शाहांनीच उत्तरं दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.