पक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा सल्ला

| Updated on: Jan 15, 2021 | 8:18 PM

राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (chandrakant patil advice to raj thackeray over Gram Panchayat elections)

पक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा सल्ला
Follow us on

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येते, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. (chandrakant patil advice to raj thackeray over Gram Panchayat elections)

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला. महापालिका निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरलं पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळतं, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेबरोबरच्या युतीची शक्यता फेटाळून लावली. मनसेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढणार

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात काल भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, असं पाटील म्हणाले.

आत्मनिर्भर अभियानातून जनसंपर्कावर भर

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचे निकष ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला लावता येणार नाही. गेल्या दोन निवडणुकांपेक्षा यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला अधिक मतदान झालं आहे, असं सांगतानाच आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. त्याचा फायदा आम्हाला निवडणुकीत होईल, असंही ते म्हणाले. (chandrakant patil advice to raj thackeray over Gram Panchayat elections)

 

संबंधित बातम्या:

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती

देव पावला! पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत महिन्याभरात 35 लाखांचं दान!

(chandrakant patil advice to raj thackeray over Gram Panchayat elections)