Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय, पीपीई किट घालून फिरून पाहा; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. (chandrakant patil advised cm uddhav thackeray on corona pandemic)

आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय, पीपीई किट घालून फिरून पाहा; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 7:44 PM

पंढरपूर: राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पनाच नाही. मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून फिरावं म्हणजे त्यांना वास्तवाची जाणीव होईल, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. (chandrakant patil advised cm uddhav thackeray on corona pandemic)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवाताडे यांचा प्रचार करण्यासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला. मुंबईची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. आम्हाला या लॉकडाऊनमध्ये कुठेही राजकारण करायचे नाही. आम्ही या लॉकडाऊनमध्ये सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. पण आता मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केल्यास त्यांनाही राज्यातील भीषण स्थिती समजू शकेल, त्यामुळे त्यांनी राज्यात फिरावे व राज्यातील विदारक स्थिती समजावून घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना करीत आहोत, असे पाटील म्हणाले.

पवारांनी स्वार्थासाठी मुख्यमंत्री बनवले

सध्याचे मुख्यमंत्री फक्त एका पक्षाचेच प्रमुख असल्यासारखे वागतात. शरद पवार साहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री बनविले व स्वत: सरकारच्या बाहेर राहिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. कदाचित म्हणूनच त्यांनी ऑक्सिजन हे विमानाने आणण्याबाबत काल भाष्य केले, असं सांगतानाच महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था सरकारला करावी लागेल. ऑक्सिजन असो वा रेमडेसिवीर इंजेक्शन किंवा व्हेंटिलेटर असू दे जोपर्यंत मुख्यमंत्री स्वत: पीपीई किट घालून बाहेर फिरत नाहीत तोपर्यंत नेमके काय सुरु आहे हे मुख्यमंत्र्यांना कळणार नाही, असंही ते म्हणाले.

फक्त 105 रुपयांचं धान्य मोफत मिळणार

आधी पॅकेज जाहीर करा नंतरच लॉकडाऊन करा, अशी मागणी आम्ही केली होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना पॅकेजची घोषणा करावी लागली, असं सांगतानाच मोफत धान्य वाटपाची केलेली घोषणा अतिशय फसवी आहे. सध्या एका कुटुंबाला 35 किलो धान्य 105 रुपयांमध्ये मिळत आहे. ते 105 रुपयांचे धान्य मोफत देणार व त्याच्या बदल्यात सरकार 105 रुपये भरणार हा सगळा सावळा गोंधळ सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

लसींची श्वेतपत्रिका काढा

यावेळी त्यांनी राज्यात लसींचा तुटवडा नसल्याचा दावाही केला. फक्त लसीच्या विषयावरून राजकारण सुरु आहे. लस काळा बाजार करुन विकण्यात आली. त्यामुळे लसीबाबत एकदा श्वेतपत्रिका जाहिर करावी. केंद्राकडून किती लसी आल्या. 45 वय वर्षेवरील किती जणांनी लसी दिल्या, 60 वय वर्षेवरील माणसे किती? कोविड योध्दे किती? हे समजले पाहिजे. कारण लसीसाठी जे पात्र नाहीत असे सत्ताधारी पक्षाचे काही नेते व पदाधिकाऱ्यांना लस देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. (chandrakant patil advised cm uddhav thackeray on corona pandemic)

संबंधित बातम्या:

36 वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मतं मागतोय, शिवसेनेचा फायरब्रँड नेता पंढरपूरच्या मैदानात

आघाडी सरकार लवकरच पडेल, आठवीतला मुलगाही सांगेल; चंद्रकांत पाटील यांचं पुन्हा भाकीत

पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार; लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा

(chandrakant patil advised cm uddhav thackeray on corona pandemic)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.