राजाही वर्क फ्रॉम होम प्रजाही वर्क फ्रॉम होम, निर्बंधावरून पुन्हा पाटलांची मुख्यमंत्र्यांना टोलेबाजी
चंद्रकांत पाटलांनी राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम असे म्हणत मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत.
राज्यात लावलेल्या निर्बंधावर भाजप नेते सतत टीका करत आहेत, तसेच मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, यावरूनही चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम असे म्हणत मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. महाविकास आघाडी सरकारामधील नेत्यांचा आपाआपसात पायपोस नाहीये, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. निर्बंधाच्या घोळामुळे एक आत्महत्या नाही तर अनेक आत्महत्या झाल्या, भयानक सुरू आहे सर्व,मुंबई पालिका आयुक्त चहल खरं बोलतायत का उद्धव ठाकरे ? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.
काही तासांपूर्वीच चंद्रकांत पाटलांचे ट्विट
सततच्या लॉकडाऊनच्या जाचाला कंटाळून पुण्यातल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी कळली. शिथिल न झालेले निर्बंध आणि नोकरी गमावून बसल्यामुळे तरुणांना आपलं आयुष्य संपवावं लागत आहे. मात्र सरकारने निर्बंधांचा कळस गाठला असून नागरिकांचा गळा घोटणं सुरूच ठेवलं आहे. मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. अशी टीका त्यांनी ट्विट करत केली होती.
पटलांना राजे टोपेंचे प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना नेहमी जान है तो जहान है, असे बोलतात, त्यामुळे जीव आहे, सर्व आहे, चंद्रकांत पाटलांनी हे लक्षात घ्यावे असे टोपे म्हणाले आहेत. राज्यातली रुग्णसंख्या कमी झाली की निर्बंध शिथील करता येतील. सध्या रुग्णसंख्येतील वाढ मोठी आहे त्यामुळे निर्बंध घालणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले आहे. आज आपण संपूर्ण बंद नाही केलं, काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन बंद केल्याचे टोपे यांनी सांगितलं.