Chandrakant Patil : रोहिणी खडसे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध, चंद्रकांत पाटील विधानसभेत मुद्दा मांडणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला आहे. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

Chandrakant Patil : रोहिणी खडसे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध, चंद्रकांत पाटील विधानसभेत मुद्दा मांडणार
रोहिणी खडसे, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 7:25 AM

हिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला आहे. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे. विधानसभेत या हल्ला प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

मुक्ताईनगरमध्ये महिला चांगल्या प्रकारे काम करतात. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी शासनदरबारी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. हे प्रकरण विधानसभेत मांडणा असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

लोखंडी रॉडच्या सहाय्यानं हल्ला, तपास सुरु असल्याची पोलिसांची माहिती

एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या वर चांगदेव वरून येत होत्या. नेमक्या याच वेळी लोखंडी रॉडच्या सहायाने काही अज्ञातांनी गाडीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळाली आहे. या घटनेच्या पार्शवभूमीवर पोलिसांनी आपला तपास सुरू केला असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

रक्षा खडसे यांच्याकडून विचारपूस

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांना मिळताच त्यांनी रोहिणी खडसे यांची घेतली भेट घटनेबाबत विचारपूस केलीय.

पोलिसांनी तातडीनं तपास करावा, रुपाली चाकणकर

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला.एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

इतर बातम्या:

Jalgaon | मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंच्या गाडीवर दगडफेक

Rohini Khadse Car Attack | रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक, अज्ञातांकडून हल्ला

Chandrakant Patil comment on attack on Rohini Khadse vehicle said demanding enquiry in Maharashtra Assembly

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.