आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?, चंद्रकांतदादांचा सवाल

आता कल्याणमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलाय. तसंच महाबळेश्वरमध्येही एका मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय.

आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?, चंद्रकांतदादांचा सवाल
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 4:25 PM

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. साकीनाका आणि डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. असं असताना आता कल्याणमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलाय. तसंच महाबळेश्वरमध्येही एका मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. (Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray over atrocities against women)

‘कल्याणमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वर मध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे ! आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला आहे.

तसंच ‘आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का?’, असा सवालही पाटील यांनी केलाय.

कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित चिमुकली याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जायची. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली होती. त्यामुळे शिक्षिकेचा पती शिक्षक मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. या दरम्यान पीडित आठ वर्षीय चिमुकली शिकवणीला जायला तयार नव्हती. जेव्हा तिची आई शिकवणीला जायला सांगत तेव्हा ती रडायला सुरुवात करायची.

डोंबिवलीत गँगरेप प्रकरण, आरोपींचा आकडा 33 वर

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामधील 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पाच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. कालपर्यंत 26 जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 28 वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली येथे राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली.

इतर बातम्या : 

तुळजाभवानीच्या दारातच भाविकांची लूट, भाविकांनी दान केलेल्या हजारो रुपयांवर डल्ला!

भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची थेट हायकोर्टात धाव, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray over atrocities against women

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.