‘शेतकऱ्यांना मदतीऐवजी मविआ सरकार फक्त पोपटपंची करतं’ चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र, काळी फीत लावून निषेधाचं आवाहन

शेतकरी किंवा समाजातील अन्य घटकाकडे लक्ष द्यायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही. हे सरकार फक्त पोपटपंची करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तसंच 1 नोव्हेंबर रोजी काळी फीत लावून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याचं आवाहनही पाटील यांनी केलं आहे.

'शेतकऱ्यांना मदतीऐवजी मविआ सरकार फक्त पोपटपंची करतं' चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र, काळी फीत लावून निषेधाचं आवाहन
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 3:46 PM

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकरी किंवा समाजातील अन्य घटकाकडे लक्ष द्यायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही. हे सरकार फक्त पोपटपंची करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तसंच 1 नोव्हेंबर रोजी काळी फीत लावून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याचं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. (Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi government, appeals to protest the government with black ribbon)

नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतंय. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्यात 29 अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांनीही आत्महत्या केल्यात. ST कर्मचारी, शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगून सरकारच्या निषेधासाठी सोमवार, 1 नोव्हेंबरला काळी फीत लावूया, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेला केलंय.

1 लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार

अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची घोषणा केली.

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नाही. या सरकारने राज्यातील शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. शेतकऱ्याच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचं बोलघेवडे आश्वासन

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि पुढील किमान दहा वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही अशी अपरिमित हानी झाली. या शेतकऱ्यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजीही केली. पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, पण मंत्रालयाकडे मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यास न्याय मिळालाच नाही, असा दावा उपाध्ये यांनी केलाय.

इतर बातम्या :

चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात, ‘मी वाट पाहतोय’!

‘पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा’, अजितदादांच्या नेतृत्वात कामाला लागण्याचे सुप्रिया सुळेंचे आदेश

Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi government, appeals to protest the government with black ribbon

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....