Chandrakant Patil | पवारांनी मोदींच्या ऑफरबद्दल सांगितलं, आता चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला, म्हणाले…

मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांना चांगलेच टोले लगावले आहेत. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते माध्यमांशी बोलत होते.

Chandrakant Patil | पवारांनी मोदींच्या ऑफरबद्दल सांगितलं, आता चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला, म्हणाले...
CHANDRAKANT PATIL AND SHARAD PAWAR
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 1:14 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना कोणत्या घडामोडी घडल्या याबाबत एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली. तसेच या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी विचारलं होतं, असंदेखील पवार यांनी सांगितलं.  शरद पवार यांच्या या वक्तव्यांवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांना चांगलेच टोले लगावले आहेत. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते माध्यमांशी बोलत होते.

तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा, विश्वास कोण ठेवणार 

“मोदी यांनी आपण एकत्र सरकार स्थापन करु असं सांगितलं होतं असे भाष्य शरद पवार यांनीक केले. तसेच अजित पवार यांनी शपथ का घेतली ? शरद पवार यांनी त्यांना पाठवले होतो का ? हे मला समजणार नाही. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण मी शरद पवार यांना एकच प्रश्न विचारेन की हे सांगायला तुम्हाला इतके महिने का लागले. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार. मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का ? हा मोठा प्रश्न आहे,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

नारायण राणे सर्वांना पुरुन उरणारे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याबाबत बोलताना त्यांच्या पत्ता सांगायला मी काय मुर्ख आहे का ? अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे सांगितले होते. त्यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. “राणे सर्वांना पुरून उरणार आहेत. नारायण राणे तसेच नितेश राणे यांच्या स्टेरमेंटवर ते कमेंट करत नव्हते. बराच काळ ते बोलण्याचे धाडस करत नव्हते. महाविकास आघाडी सरकार कृत्रिमरित्या आलेलं आहे. लोकांनी त्यांना कौल दिला नव्हता. विद्यापीठ सुधारणा कायदा ज्याप्रकारे समंत करुन घेतला तो नियमांना धरून नव्हता. नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं अशीच परंपरा सुरु झाली आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

New Year And Corona Rule | पार्टी करण्यासाठी पूर्ण वर्ष, गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई : दिलीप वळसे पाटील

Nashik|मुलगा सैन्यात म्हणून सेवानिवृत्त जवानाने गावजेवण दिले; इकडे तोतया लष्करी अधिकाऱ्याने बेरोजगारांसह पत्नीलाही गंडवले

औरंगाबादेत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 25 हजारांत एक लाखाचा धंदा! 6 लाखांचे खोटे चलन बाजारात?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.