शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील

बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली.

शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 12:08 PM

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढे केला आहे. “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली. आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता असल्याचे ते म्हणाले. (Chandrakant Patil explains what he meant by comment on BJP reuniting with Shivsena)

शिवसेनेला उपरती झाली, तर येतील, आम्ही काही प्रयत्न करणार नाही. भाजपने हात पुढे केला असे काही अर्थ काढू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितले आहे, इतके कणखर व्हा, की यापुढे कुठलीही निवडणूक एकट्याने लढवता आली पाहिजे. आताही शिवसेनेला सरकार करायचं झालं तर आम्ही एकत्र येऊ. जर उद्धवजीना वाटले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना बाजूला करु, तर ते केंद्रीय नेतृत्वाला सांगतील” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा : राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार : चंद्रकांत पाटील

“बिहारमध्ये जे झालं, ते महाराष्ट्रातही होऊ शकतं. नितीशकुमार यांनी तर लालू प्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती आणि सरकार स्थापन केलं. मात्र त्यांना डोकेदुखी झाली आणि एका वर्षात त्यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपला एकत्र घेऊन सरकार स्थापन केले” असा दाखला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महाराष्ट्रातही असं होऊ शकतं. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटलं, की “फार झालं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आपलं हिदुत्व संपवत आहेत, त्यांना वाटलं तर ते आमच्या केंद्रीय नेतृत्वाला सांगतील. मग केंद्राने आम्हाला आदेश दिला, तर आम्ही त्याच्या बाहेर नाही. सध्या आम्ही विरोधी पक्षाच्या मूडमध्ये आहोत. पण पाच वर्ष सत्तेत एकत्रच होतो ना. राजकारणात काहीही शक्य नाही. बिहारमध्ये तर भाजप आणि नितीशकुमार विरोधात लढले होते, पण इथे तर आम्ही एकत्र लढलो. त्यामुळे उद्या त्यांना उपरती झाली, तर ते येतील, आम्ही काही प्रयत्न करणार नाही. त्यामुळे भाजपने हात पुढे असे काही अर्थ काढू नका. कारण निवडणुका मात्र आम्ही स्वबळावरच लढवणार” असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची काल पहिली बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्यासाठी तयारी करा, असे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.

संबंधित बातम्या 

Chandrakant Patil | अजित पवार हेडमास्तर, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं : चंद्रकांत पाटील 

(Chandrakant Patil explains what he meant by comment on BJP reuniting with Shivsena)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.