AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांसाठी सेफ गेम, पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी?

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी, अशी इच्छा भाजपाच्या नेत्यांची होती पण, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ सुरक्षित वाटत नव्हता.

चंद्रकांत पाटलांसाठी सेफ गेम, पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी?
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 8:43 AM

पुणे : भाजपच्या दृष्टीने पुण्यातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे-कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Kothrud BJP Candidate) यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात शिवसेनेचं प्राबल्य पाहता चंद्रकांतदादांसाठी भाजप पुण्यातून सेफ गेम खेळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील सध्या पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी, अशी इच्छा भाजपाच्या नेत्यांची होती पण, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ सुरक्षित वाटत नव्हता. अखेर त्यांच्यासाठी कोथरुड मतदारसंघ निश्चित केल्याची माहिती आहे.

मेधा कुलकर्णी या सध्या भाजपच्या तिकीटावर कोथरुड मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात उमेदवारच नसल्यामुळे आघाडीमध्ये हा मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यात आला आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघाच्या तुलनेत युतीसाठी कोथरुड सर्वात सुरक्षित समजला जात आहे. चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमधून निवडणूक लढवल्यास (Chandrakant Patil Kothrud BJP Candidate) कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

भाजपच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब, तिकीटं जाहीर होण्यात दिरंगाई

कोथरुड, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात युतीचं नेहमीच प्राबल्य राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुडमधून सर्वाधिक 97 हजार 410 मतांची आघाडी मिळाली होती. कसबा विधानसभा मतदारसंघातून 50 हजार तर शिवाजीनगरमध्ये 25 हजार मतांची आघाडी बापट यांना मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव निश्चित केलं गेलं आहे.

मुक्ता टिळक यांना कसबा पेठ?

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांचं नाव निश्चित झाल्याचीही माहिती आहे़. विद्यमान आमदार गिरीश बापट यांच्या जागी मुक्ता टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कसबा पेठ या भाजपच्या बालेकिल्ल्यावर बापटांनी गेली अनेक वर्ष झेंडा फडकवला आहे. बापट खासदार झाल्याने 20 वर्षांनंतर प्रथमच कसबा पेठेमध्ये तिकीटासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली. गेली अडीच वर्षे पुण्याचं महापौर पद सांभाळताना मुक्ता टिळक यांनी स्वच्छ प्रतिमा जपल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार आहे. मात्र भाजपच्या अनिल शिरोळे यांचे पुत्र आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचंही म्हटलं जातं. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार, याची उत्सुकता आहे.

भाजपच्या संसदीय समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं, मात्र उमेदवारांची घोषणा करण्यात दिरंगाई होत आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.