VIDEO: फायर ब्रँड नेत्या मंदा म्हात्रे म्हणाल्या, भाजपात सन्मान मिळत नाही, चंद्रकांतदादा म्हणाले, संवाद साधू
भाजपच्या नवी मुंबईतील आमदार आणि फायर ब्रँड नेत्या मंदा म्हात्रे यांनी पक्षात महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तसेच पक्षात महिलांना डावललं जात आहे, असं म्हटलं होतं. (chandrakant patil)
जालना: भाजपच्या नवी मुंबईतील आमदार आणि फायर ब्रँड नेत्या मंदा म्हात्रे यांनी पक्षात महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तसेच पक्षात महिलांना डावललं जात आहे, असं म्हटलं होतं. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदा म्हात्रेंशी संवाद साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (chandrakant patil reaction on MLA manda mhatre allegations)
चंद्रकांत पाटील जालन्यात आले होते. त्यावेळी त्यांना मंदा म्हात्रे यांच्याविधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमध्येच अशा प्रकारे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं वातावरण आहे. मंदाताईंना स्वत:ला काही अनुभव आले असतील तर त्यांच्याशी बोलू. आमच्यासारख्यांचा प्रवास त्यासाठीच आहे. आज तुम्ही बघितलं, मी कार्यकर्त्यांना भेटलो त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यामुळे कार्यकर्त्याला मोकळेपणाने बोलायला लावणं आणि त्याच्या बोलण्यातून आलेल्या समस्या सोडवणं ही आमची कार्यपद्धती आहे. मंदाताई आणि देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत चांगला संवाद आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊ, असं पाटील म्हणाले.
मंदाताई काय म्हणाल्या होत्या?
एका कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. विशेष म्हणजे महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो. एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
कुठलीही भीती बाळगू नका
आपल्याच पक्षातील माणसं, जर एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली, तर मग त्याला भीती निर्माण होते, मग भीती निर्माण झाल्यावर फोटो टाकायचं नाही, कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे. लक्षात घ्या महिलांनो. ज्यावेळी तुमचा फोटो टाकायचा असेल तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर समजायचं तुमच्या कार्याने धडकी निर्माण झाली आहे. काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपलं काम करत राहायचं, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या. (chandrakant patil reaction on MLA manda mhatre allegations)
संबंधित बातम्या:
फायरब्रँड मंदा म्हात्रेंची सीधी बात, होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!
यापुढे गर्दी होणार नाही, मुख्यमंत्र्यांना खंत वाटणार नाही असेच कार्यक्रम घेऊ: महापौर किशोरी पेडणेकर
आधी पप्पांना गाडीने उडवलं सांगितलं, नंतर वडिलांच्या हत्येची कबुली, तरुणाने असं का केलं?
(chandrakant patil reaction on MLA manda mhatre allegations)