पंकजांनी महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, ही तर केंद्राची इच्छा : चंद्रकांत पाटील

भाजपच्या कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली (Chandrakant patil said Pankaja Munde will get chance in Central committee).

पंकजांनी महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, ही तर केंद्राची इच्छा : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 5:29 PM

मुंबई :माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, कारण त्यांनी केंद्रात वेळ द्यावा, अशी केंद्राची अपेक्षा आहे”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले. भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही. दरम्यान, त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली (Chandrakant patil said Pankaja Munde will get chance in Central committee).

“पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये चांगली जबाबदारी मिळणार आहे. केंद्राने असं सूचवलं की, केंद्रामध्ये त्यांना जबाबदारी देत आहोत. त्यामुळे पंकजा आमच्या कोअर कमिटीच्या 100 टक्के सदस्या असतील. त्या आमच्याबरोबरच राहतील. पण महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, कारण त्यांनी केंद्रात वेळ द्यावा, अशी केंद्राची अपेक्षा आहे. केंद्राची जबाबदारी महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या सदस्यांना शंभर टक्के असेल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant patil said Pankaja Munde will get chance in Central committee).

हेही वाचा : भाजपची कार्यकारिणी जाहीर, प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात

भाजपच्या कार्यकारिणीत खासदार प्रितम मुंडे यांना उपाध्यक्ष तर खासदार रक्षा खडसे यांना सेक्रेटरी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भाजप नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता हेदेखील कार्यकारणीत आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“पंकजा मुंडे यांची बहिण किंवा एकनाथ खडसे यांची सून म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर नाराजी दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. नाराजी तात्पुरती असते. प्रितम मुंडे, रक्षा खडसे या दोन टर्म खासदार आहेत. त्या कर्तृत्वान आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे त्यांना काम मिळाले”, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

“जीवंत मानसाच्या संघटनेत नाराजी असणारच. ती लगेच संपते. नाराज कोणी नसतं. पण कार्यकारणीबाबत आम्ही सगळ्यांचा सल्ला घेतो”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोरोना संकटामुळे भाजपची कार्यकारणी घोषित करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते. त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 5 सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत.

या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत”.

कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल.

नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.