मग परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टातील याचिका खोटी आहे का?; चंद्रकांतदादांचा वर्मावर घाव
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कोणाच्या तरी दबावात गृहखात्यावर आरोप केल्याचा दावा आघाडी सरकारचे नेते करत आहेत. (chandrakant patil slams sharad pawar over parambir singh letter issue)
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कोणाच्या तरी दबावात गृहखात्यावर आरोप केल्याचा दावा आघाडी सरकारचे नेते करत आहेत. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका खोटी आहे का? असा सवाल करत वर्मावरच घाव केला आहे. (chandrakant patil slams sharad pawar over parambir singh letter issue)
मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी हा सवाल केला आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्यासाठी वकिली करणारे व त्यांची सातत्याने पाठराखण करणारे शरद पवार यांनी आता तरी महाराष्ट्राची बेअब्रू रोखावी व त्यांच्या आरोपांचे उत्तर देऊन तात्काळ देशमुखांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
लोकलप्रकरण राष्ट्रीय झाले
शिवसेनेशी संबंधित सचिन वाझेंचे प्रकरण हे लोकल लेव्हलचे असल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही, असे वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांना परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर बहुतेक हे प्रकरण मोठे राष्ट्रीय पातळीचे वाटले असावे म्हणूनच कदाचित पवारांनी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर देशमुख यांना वाचविण्यासाठी पत्रकार परिषदांचा सिलसिला सुरु केला असावा, असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला
मग सिंग कोर्टात का गेले?
सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींची खंडणी गोळा करण्याचे आरोप केल्यानंतर हे सर्व आरोप कसे चुकीचे आहेत, ते पत्रच खोटे आहे, पत्रावर शंका व्यक्त होत आहे व त्या पत्रातील नोंदीनुसार सचिन वाझे व देशमुख यांची भेटच झाली नसल्याचे तारखांचे दाखले पवारांनी तातडीने दिल्याचे निदर्शनास आणून देतानाच पाटील म्हणाले की, जर सिंग यांनी ते पत्रच लिहिले नसते तर त्यांनी पोलिस सेवेत असतानाही गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल का केली असती? याचे उत्तर पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुरावे नष्ट करण्याआधीच देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशीची मागणी सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केली असेल तर न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका सुध्दा खोटी आहे का? असा सवालही त्यांनी केला.
कुणाच्या कृष्णकृत्यावर पडदा टाकत आहात?
दोन दिवस होऊनही महाराष्ट्राच्या अब्रुचे धिंडवडे काढणाऱ्या या गंभीर पत्राच्या चौकशीचे साधे आदेश अद्यापही महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाहीत. विशेष म्हणजे सिंग यांच्या लेटरबॉम्बमध्ये खुद्द शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. ज्या अर्थी पवार यांनी याबाबत कुठेही इन्कार केला नाही, त्या अर्थी या पत्रामध्ये तथ्य असल्याचे सिध्द होते, मग सत्तेच्या लालसेपोटी पवार या प्रकरणात नक्की कोणाच्या कृष्णकृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा सवालही त्यांनी केला. (chandrakant patil slams sharad pawar over parambir singh letter issue)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 22 March 2021https://t.co/dmhkh0Ca87
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवार का बनले अनिल देशमुखांची ढाल?, काय आहे त्या मागचे राजकारण?; वाचा सविस्तर
परमबीर सिंग यांची प्रॉपर्टी किती, जनतेला कळू द्या, राष्ट्रवादीची मोठी मागणी
परमबीर सिंगांचा दुसरा मोठा दावा, रश्मी शुक्लांनीही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली होती!
‘सुपारी बाग’ व ‘बाकडा कंपनी’ला ‘अडकित्ता बाग’चा पर्याय; कसं आहे ‘संकटमोचक’ गिरीश महाजनाचं राजकारण!
(chandrakant patil slams sharad pawar over parambir singh letter issue)