उद्धव ठाकरे यांना आधी वाटलं लोकांचं सर्व दु:ख ‘मातोश्री’वर बसूनच कळतं, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई : भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. या दौऱ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना फार उशिरा कळलं महात्मा गांधी यांच्यासारखे नेते देश फिरले. गांधी यांनी देशात फीरून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मात्र ठाकरेंना वाटलं की मातोश्रीवरूनच सर्वसामान्यांचे दु:ख कळतात, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले पाटील?
सध्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. या दौऱ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना फार उशीरा कळलं महात्मा गांधी यांच्यासारखे नेते देश फिरले. ठाकरेंना वाटलं की मातोश्रीमधूनच लोकांची दु:ख कळतात. उद्धव ठाकरे यांना फार उशिरा साक्षात्कार झाला. ते आता फिल्डवर फिरत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र प्रत्यक्ष फिल्डवर असताना काही गोष्टींची मागणी करायची असते. ही मागणी करताना आपली सत्ता असताना ती गोष्ट आपण केली होती का हे देखील लक्षात ठेवायचे असते असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरेकरांची टीका
दरम्यान दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील काल उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची चौकशी करायचे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.