आम्ही रेमडेसिवीर काय पाकिस्तान किंवा चायनाला देत होतो का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? (Chandrakant Patil taunt to Thackeray Government)

आम्ही रेमडेसिवीर काय पाकिस्तान किंवा चायनाला देत होतो का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
Chandrakant Patil
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 1:39 PM

पुणे: आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil taunt to Thackeray Government)

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.

विष तर वाटत नाही ना?

आम्ही रेमडेसिवीरचं वाटप केलं तर त्यात काय चुकलं? विष तर वाटत नाही ना? लोकांना इंजेक्शन हवं आहे. लोक वणवण भटकत आहेत. 22 तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही, असंही ते म्हणाले. लोकांना मदत करणं चुकीचं आहे का? रोहित पवारही मदत करत आहेत. ते योग्यच आहे. तुम्हीही मदत करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा, असं त्यांनी सांगितलं.

सरकारी यंत्रणा कुठे आहे?

सरकारची यंत्रणा कुठे आहे? मला आता काही हॉस्पिटलचा फोन आला. अजूनही लस आली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लसीकरणाचा खोटा प्रचार सुरुय, तो त्यांच्या लक्षात आलाय. जसा जसा साठा येईल तसा पुरवठा केला जाईल. पुण्यात 6 लाख लसीकरण झालं, असंही त्यांनी सांगितलं.

राऊतांवर पुस्तक लिहितोय

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पीएचडी करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एमफील करत आहे. आणि संजय राऊतांवर पुस्तक लिहित आहे. काय बोलावं राऊतांबद्दल. ते वर्णन करण्यापालिकडचं व्यक्तिमत्त्व आहे, असा चिमटा त्यांनी काढला. (Chandrakant Patil taunt to Thackeray Government)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता, मग इथल्या मातीचं ऋण फेडा; बाळासाहेब थोरातांनी गोयलांना फटकारले

महिलेच्या मृत्यूनंतर अडीच तोळ्यांचं मंगळसूत्र लंपास, नाशिकच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

रेमडेसिवीर, लसीकरणाबाबत पुरंदरशी भेदभाव; शिवसेना नेत्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

(Chandrakant Patil taunt to Thackeray Government)

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.