‘फडणवीसांना या प्रकरणात ओढण्याचे परिणाम भोगावे लागणार’, चंद्रकांत पाटलांचा मलिकांना निर्वाणीचा इशारा

मलिकांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. अशावेळी भाजप नेत्यांकडून मलिकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांना परिणाम भोगावे लागतील, असा सूचक इशाराच दिला आहे.

'फडणवीसांना या प्रकरणात ओढण्याचे परिणाम भोगावे लागणार', चंद्रकांत पाटलांचा मलिकांना निर्वाणीचा इशारा
नवाब मलिक, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 12:57 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात आता थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मलिकांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. अशावेळी भाजप नेत्यांकडून मलिकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांना परिणाम भोगावे लागतील, असा सूचक इशाराच दिला आहे. (Chandrakant Patil warns Thackeray government after Nawab Malik’s allegations against Devendra Fadnavis)

गेले काही दिवस महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक बेछुट आरोप करत आहेत. हे आरोप करताना भाजप आणि फडणवीस यांना त्यात ओढण्याचे परिणाम भोगावे लागतील. मलिकांना पुराव्याशिवाय बोलण्याचे परिणाम भोगावे लागतील. मूळ मुद्द्यांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असा प्रकार केला जातोय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांना संप सुरु आहे, त्यावर बोला. अनिल देशमुखांची काळजी करण्याऐवजी जे वानखेडेंची काळजी करत आहेत. वानखेडेंच्या मागे समाज उभा आहे. चौकशी करा, बेछूट आरोप का करताय? असा सवाल पाटील यांनी मलिकांना केलाय.

’19 महिन्यात तुम्ही आमचं काही वाकडं करु शकला नाहीत’

आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून आरोप केले जात आहेत. नीरज गुंडे हा चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे. काही पुरावे असतील तर चौकशी करा. एक संजय राऊत कमी होते, त्यांच्या जोडीला आता मलिक आहे. सीबीआय चौकशी करायची तर करा. 19 महिन्यात तुम्ही आमचं काही वाकडं करु शकलेले नाहीत, अशा शब्दात पाटील यांनी मलिकांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय.

नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका केली, तर त्यासोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले. समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे.

ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे. निरज गुंडे त्यांच्यामध्ये जाऊन कसा बसतो, का भाजपचे लोक सुटतात. आता ते हेच बोलतील की आम्हाला माहित नव्हतं. पण, त्यांना माहित होतं.

इतर बातम्या :

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

मलिक म्हणाले, गुंडेचे फडणवीसांशी संबंध, आता देवेंद्र म्हणतात, त्यांचे तर उद्धव ठाकरेंशीही संबंध

Chandrakant Patil warns Thackeray government after Nawab Malik’s allegations against Devendra Fadnavis

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.