उद्धव ठाकरे चहापानाला गैरहजर, चंद्रकांत पाटील म्हणतात, आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, काल ते वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती मिळतेय. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज देण्याची मागणी केली आहे.
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, काल ते वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती मिळतेय. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज देण्याची मागणी केली आहे.
आरोग्याच्या कारणावरुन राज्यावर अन्याय करु नका. 45 दिवसांपासून राज्यातील जनतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण तोपर्यंत त्यांनी कुणाकडे तरी चार्ज द्यावा. तीन पक्षांचं सरकार आहे. हवं तर तिघांचं मिळून एक मंडळ तयार करा. आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची फाईल 5 तास पडून होती. असा व्यक्तींवर ही वेळ येत असेल तर इतरांचं काय. त्यामुळे महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही, असं पाटील म्हणाले.
चहापानाच्या कार्यकर्माला मुख्यमंत्री अनुपस्थित
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav प्रत्यक्षपणे सहभागी नव्हते. मात्र, त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या चहापानाच्या कार्यकर्मावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला.
मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली, स्टॅम्पवर लिहून देऊ का?- अजित पवार
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. त्यावेळी ते त्यांच्या सोयीने विधीमंडळ कामकाजात सहभागी होणार अजित पवारांनी स्पष्ट केली. वेगवेगळ्या मार्गांनी त्याच आशयाचे प्रश्न आल्यानंतर मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार आहेत, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा प्रतिसवालही त्यांनी केला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
चहापानाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी व्हिडीओ कॉलवर संपर्क केला आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. त्यांनी मला, थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील यांना उद्या 9 वाजता बैठक घ्यायला लावली आहे. आज त्यांनी आम्हाला वर्षावर देखील बोलावलं होतं सर्व मंत्र्यांना त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांची तब्येत चांगली आहे. दोन दिवसांपूर्वीच ते विधानभवनात येऊन गेले होते, अशी माहिती अजितदादांनी दिली.
इतर बातम्या :