VIDEO: चंद्रकांतदादा चार दिवस दिल्लीत थांबले, ना मोदी, ना शहांची भेट; मनसे युतीचा निर्णय अधांतरी?

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवस दिल्लीत होते. चंद्रकांतदादा या दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. (Chandrakant Patil,)

VIDEO: चंद्रकांतदादा चार दिवस दिल्लीत थांबले, ना मोदी, ना शहांची भेट; मनसे युतीचा निर्णय अधांतरी?
CHANDRAKANT PATIL
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 1:17 PM

नवी दिल्ली: भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवस दिल्लीत होते. चंद्रकांतदादा या दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. यावेळी ते मनसे युतीबाबतही चर्चा करणार होते. पण चार दिवस दिल्लीत राहूनही त्यांची या दोन्ही नेत्यांशी भेट झाली नाही. त्यामुळे मनसेबाबत युतीचा निर्णयही लटकला असल्याचं सांगितलं जात आहे. (Chandrakant Patils no meeting with pm modi and amit shah)

चंद्रकांतदादा काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत जाण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मनसेच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रकांतदादा दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, राज्यातील संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल. यावेळी राज यांच्यासोबत झालेली भेट आणि भेटीतील चर्चेचा तपशीलही त्यांना देण्यात येईल, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं होतं.

शहांनी भेट नाकारली?

दरम्यान, पाटील यांनी दिल्लीत आल्यानंतर त्यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर संघटन महामंत्री बीएल संतोष यांची भेट घेतली. अमित शहा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. या भेटीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. चंद्रकातदादांनी शहा यांची भेट मिळावी म्हणून बराच प्रयत्न केला. मात्र, शहा यांनी पाटील यांची भेट नाकारल्याचं सूत्रांनी सांगितलं. शहा-पाटील यांच्या भेटीत प्रामुख्याने मनसे युतीवर चर्चा होणार असल्याने ही शहा यांनी पाटील यांची भेट नाकारल्याचं सांगितलं जातं.

व्यस्ततेमुळे भेट नाही झाली

दरम्यान, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे शहा व्यस्त होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं. शहा यांनी भेट नाकारल्याचं वृत्तही त्यांनी फेटाळून लावलं. संसदेच्या कामामुळे ही भेट झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सत्तांतराचा संबंध नाही

हा रुटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचं काम चालतं. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटणं आणि खातं समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असं सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

युतीबाबत रेड अॅलर्ट नाही

मनसे-भाजप युतीची या भेटीत चर्चा होणार होती ती झाली नाही. त्याबाबत विचारले असता, आमची युतीसाठी भेट नव्हतीच. एकमेकांना समजून घेणं, मनसेची परप्रांतियांबाबतची भूमिका समजून घेण्यासाठी ही भेट होती, असं सांगतानाच युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाने रेड अॅलर्ट दिला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (Chandrakant Patils no meeting with pm modi and amit shah)

संबंधित बातम्या:

‘ती’ भेट टाळता आली असती, केंद्रीय भाजप नेत्यांचे चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष निर्देश?

केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे; घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची खोचक टीका

चव्हाण, भुजबळांसह अनेक खासदार, मुख्यमंत्र्यांवर मनी लॉन्ड्रिंगचे खटले; ईडीची सुप्रीम कोर्टात यादी; यादीत आणखी कोण?

(Chandrakant Patils no meeting with pm modi and amit shah)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.