BJP : ‘भाजपला रावणासारखा अहंकार’ नाना पटोलेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर
आज राष्ट्रपती पदाची निवडणुक होत आहे. एनडीए ने एका सुशिक्षित अदिवासी महिलेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांना अधिक तर मते मिळतीलच पण विरोधकांनी लढण्यापूर्वीच शस्त्रे खाली ठेवली आहे. शिवसेनेने देखील पाठिंबा दर्शिवल्याने आता 182 मते तर निर्विवाद होत आहेत. अपक्ष आणि उमेदवार पाहून आणखी 18 मते मिळण्यासाठी फारकाही कसरत करावी लागणार नाही.
मुंबई : राज्यातील सत्तांतरापासून राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप हे वाढलेले आहेत. सत्तेसाठी (BJP) भाजपाकडून कायपण केले जाऊ शकते हे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. तर दुसरीकडे (MVA) महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही स्थिती ओढावल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 105 आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सबंध राज्याने पाहिले आहेत. यामधून भाजपाचा रावणासारखा अहंकार समोर येत असल्याचा आरोप (Nana Patole) कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केला होता. मात्र, भाजप पक्ष नसून एक कुटुंब आहे. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विशेष अशी काळजी घेतली जाते. त्यामुळेच आजारी असलेल्या मतदरांना देखील आणण्याची सोय पक्षाच्या माध्यमातून केला जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.
…त्यामुळे तर पक्षात फूट
भाजपमध्ये प्रत्येकाला आपण एका कुटुंबात असल्याची भावना आहे. कुटुंबप्रमुख म्हणून पक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाचीच काळजी घेतली. त्यामुळेच मतदार असलेल्यांना विशेष सोय करुन मतदानासाठी आणले जात आहे. ही भाजपाची संस्कृती. पण कॉंग्रेस ना पदाधिकाऱ्यांची चिंता आणि कार्यकर्त्यांची. त्यामुळे पक्षात फूट पडत आहे. कुटुंबाप्रमाणे सर्वांना वागणून देण्याची त्यांची संस्कृती नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी कॉंग्रसेवर केला आहे.
200 पेक्षा अधिक मतांचा पाटलांना विश्वास
आज राष्ट्रपती पदाची निवडणुक होत आहे. एनडीए ने एका सुशिक्षित अदिवासी महिलेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांना अधिक तर मते मिळतीलच पण विरोधकांनी लढण्यापूर्वीच शस्त्रे खाली ठेवली आहे. शिवसेनेने देखील पाठिंबा दर्शिवल्याने आता 182 मते तर निर्विवाद होत आहेत. अपक्ष आणि उमेदवार पाहून आणखी 18 मते मिळण्यासाठी फारकाही कसरत करावी लागणार नाही. त्यामुळे एनडीए उमेदवार द्रौपर्दी मुर्मू विजय निश्चित असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
लोकशाहीचा अपमान हा भाजप पक्षाकडून केला जात आहे. बहुमत नसताना देखील घोडेबाजार करुन सत्ता काबीज करायची हा त्यांचा प्रयत्न 2019 पासून राहिलेला आहे. यामुळे सत्ता मिळवता येत असेल पण हा मतदरांचा अपमान आहे. या पक्षाला रावणासारखा अहंकार असल्यानेच सर्वकाही आपल्यालाच अशी एक भावना झाली आहे. पण मतदार हे उघड्या डोळ्याने पाहत असून आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.