आमदार बायकोने मेसेज पाठवला, ‘पत्नीशी पुन्हा प्रेमाने वागा’, खासदार धानोरकरांनी थेट स्टेटसच ठेवलं
सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागला, तर घरी तुमचे खाण्या-पिण्याचे वांदे होऊ नयेत, म्हणून तुम्ही आपल्या पत्नीशी प्रेमाने वागा, असा मिश्किल संदेश खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे
चंद्रपूर : आपल्या पत्नीसोबत प्रेमाने वागा, असा मोलाचा सल्ला चंद्रपूरमधील काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे ‘आमदार’ पत्नी प्रतिभा धानोरकर यांनीच पाठवलेला मेसेज धानोरकरांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आहे. लॉकडाऊन लागला तर घरी तुमचे खाण्या-पिण्याचे वांदे होती, असं बाळू धानोरकरांनी मित्रमंडळींना बजावलं आहे.
काय आहे मेसेज?
सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागला, तर घरी तुमचे खाण्या-पिण्याचे वांदे होऊ नयेत, म्हणून तुम्ही आपल्या पत्नीशी प्रेमाने वागा, असा मिश्किल संदेश खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. हा संदेश देणारं स्टेट्स त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलं आहे.
धानोरकरांच्या या स्टेटसची सध्या समर्थकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा मेसेज त्यांना आमदार असलेल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनीच पाठवला होता. त्यामुळे त्यांनी लगेच हा मेसेज आपल्या स्टेटसवर पोस्ट केला.
कोण आहेत बाळू धानोरकर?
बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.
…आणि बाळू धानोरकरांना चंद्रपूरमध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळाली
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2004 नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. बाळू धानोरकर यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी उमेदवारीच्या आड आली. काँग्रेसच्या यादीत धानोरकरांना तिकीट नाकारले गेले. मोठा गदारोळ झाला. धानोरकर-वडेट्टीवार-अशोक चव्हाण त्रिकूट मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारी पोहोचले. तोवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रपूरची जागा राष्ट्रवादीला द्या असा निरोप राहुल गांधींना दिला होता.
मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऐनवेळी चक्रे फिरवून बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळवून दिली. त्यासाठी धानोरकर यांच्या समर्थकांनी अगदी राहुल गांधी यांच्यापर्यंत फिल्डिंग लावली होती. विजय वडेट्टीवार यांनी बाळू धानोरकर हे कसे विनिंग कँडिटेट आहेत, हे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना पटवून दिले.
बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली
2019 च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यात दोन खासदार निवडून आले होते. मात्र, 2019 मध्ये हा आकडा फक्त एका खासदारावर आला. ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये विजय मिळवून पक्षाची लाज राखली.
संबंधित बातम्या :
स्वत: जमिनीवर बसून महिलेला खुर्ची दिली, महाराष्ट्रातील महिला आमदाराच्या साधेपणावर कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकांडा शिलेदार; कोण आहेत खासदार बाळू धानोरकर?
विदर्भातील मंत्र्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्या, बाळू धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?