वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेला शिवसेना उमेदवार वडेट्टीवारांच्या उपस्थितीतच काँग्रेसमध्ये

विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीतच संदीप गड्डमवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेला शिवसेना उमेदवार वडेट्टीवारांच्या उपस्थितीतच काँग्रेसमध्ये
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 2:11 PM

चंद्रपूर : काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याविरोधात निवडणूक लढलेले शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार (Sandeep Gaddamwar) यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. विशेष म्हणजे खुद्द विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Chandrapur Shivsena Candidate Sandeep Gaddamwar joins Congress in presence of Vijay Wadettiwar)

कोण आहेत संदीप गड्डमवार?

संदीप गड्डमवार हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक आहेत. ब्रम्हपुरी मतदारसंघातून 2009 मध्येही संदीप गड्डमवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र अवघ्या साडेपाच हजारांच्या मताधिक्याने भाजप उमेदवार अतुल देशकर यांनी निवडणूक जिंकली होती.

आधी राष्ट्रवादी, नंतर शिवसेनेकडून उमेदवारी

2014 मध्ये संदीप गड्डमवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र वडेट्टीवारांनी बाजी मारली आणि भाजप उमेदवारानंतर गड्डमवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर गड्डमवार यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पुन्हा मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात लढवली. पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. परंतु पुन्हा त्यांना पराभवाचा धक्का बसला.

“विदर्भच काँग्रेसला राजकीय दिशा देईल”

संदीप गड्डमवार यांच्यासह रवींद्र शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. “आमच्याविरोधात लढणारे पक्षात येत आहेत, हे राजकीय समीकरण चांगलं आहे. विदर्भात काँग्रेसचा प्रभाव वाढत आहे आणि विदर्भच काँग्रेसला पुढची राजकीय दिशा देईल” असं वडेट्टीवार पक्षप्रवेशावेळी म्हणाले. विजय वडेट्टीवार हे सलग दोन वेळा चंद्रपुरातील ब्रम्हपुरी मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. (Chandrapur Sandeep Gaddamwar Vijay Wadettiwar)

तर राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं…

“काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते घरवापसी करत आहेत. राष्ट्रीय विचारधारा पाळणारा पक्ष म्हणून काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 40 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या उमेदवारांना त्यावेळी ताकद मिळाली असती तर कठीण काळातही काँग्रेस तरली असती. राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं. पण आता पक्ष वाढवायचा आहे. आागामी महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करा” असे आदेश बाळासाहेब थोरात यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

संबंधित बातम्या : 

पराभूतांवर नवी जबाबदारी?, विधानसभा, लोकसभेतील पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक

नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडणार? अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; सुधाकर बडगुजरेंचं सूचक वक्तव्य

Chandrapur Shivsena Candidate Sandeep Gaddamwar joins Congress in presence of Vijay Wadettiwar

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.