‘खुशाल चौकशी करा आणि महिन्याभरात निकाल लावा’, Chandrashekhar Bawankule चं सरकारला खुलं आव्हान

'गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी करावीसी वाटली नाही. आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चोकशी करवून काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा', असा टोलाही बावनकुळे यांनी लगावलाय.

'खुशाल चौकशी करा आणि महिन्याभरात निकाल लावा', Chandrashekhar Bawankule चं सरकारला खुलं आव्हान
चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, भाजपImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 7:35 PM

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजपमध्ये आता जोरदार राजकारण तापलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आता ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलंय. ‘गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी करावीसी वाटली नाही. आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चोकशी करवून काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा’, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावलाय.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऊर्जा मंत्रीपदाच्या काळातील कामांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी व त्याचा निकाल महिन्याभरात लावावा, असं खुलं आव्हानच त्यांनी सरकारला दिलंय.

‘चौकशीमागे खासगीकरणाचा वास’

तसंच या चौकशीमागे खासगीकरणाचा वास येत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. चौकशीचा ठपका लावून अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्रातील 16 शहरांच्या खासगीकरणाचा घाट घालायचा असा यामागचा प्रयत्न असू शकतो, अशी शंका बावनकुळे यांनी व्यक्त केलीय.

‘फडणवीसांच्या काळात लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र केला’

देवेंद्र फडणवीस सरकारने लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र केला. एक शेतकरी – एक डीपी योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग दाखवला. आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली. आमच्या सरकारनेच एलीफेंटाला वीज पोहोचवली. राज्यातील 7 लाख 50 हजार शेतकऱ्यांना नव्याने वीज कनेक्शन मिळवून दिले. 45 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटींची वीज दिली असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण इतके चांगले काम करुनही आत्ताच चौकशी का ? असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केलाय.

इतर बातम्या : 

Breaking : स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या एकमेव आमदारावर कारवाई करणार? Raju Shetti यांनीच दिले संकेत!

विदर्भ मराठावाड्यासंदर्भात Ajit Pawar यांनी काहीचं उत्तर दिलं नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं टीकास्त्र

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.