Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपलं ठरलंय! यांचा कार्यक्रम वाजवायचाच; चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?

1 जानेवारी 2023 ही तारीख लक्षात ठेवा. 25 मते प्रत्येक नेत्याने आपल्या मतदार यादीत अॅड करा. तुम्ही टार्गेटचं घेऊन जा. मी तुम्हाला कर्ज मागायला आलोय. 25 मतं प्रत्येक बुथवर टाकायचं आहे.

आपलं ठरलंय! यांचा कार्यक्रम वाजवायचाच; चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?
आपलं ठरलंय! यांचा कार्यक्रम वाजवायचाच; चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 6:32 PM

मुंबई: आपल्याला येणाऱ्या प्रत्येक निवडणुका (election) जिंकायच्या आहेत. त्यासाठी हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन काम करा. नेता बनण्यासाठी बावनकुळेंची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांची (devendra fadnavis) गरज नाही. हार्ट टू हार्ट, मॅन टू मॅन केल्यास तुम्हीही नेता व्हाल. आपल्याविरोधात प्रचंड मोठी शक्ती काम करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मशाल आपल्याविरोधात एकवटले आहेत. पण आपण ठरवलंय यांचा कार्यक्रम वाजवायचा. काँग्रेसला उद्ध्वस्त करायचं असेल तर साकोलीत नाना पटोलेंना हरवल्याशिवया राहणार नाही. घडी बंद करायची असेल तर ती बारामतीमधूनच बंद होईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) म्हणाले.

ओ.बी.सी. मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आवाहन केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर तोंडसुख घेतानाच निवडणुका जिंकण्यासाठी काय तयारी करायची याचं मार्गदर्शनही कार्यकर्त्यांना केलं.

हे सुद्धा वाचा

ही मशाल अशी आहे. मागच्या अडीच वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात गेली. काँग्रेसच्या हातात मशाल आहे. त्याला घडी आहे. ही मशाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती गेली आहे. वर तेल टाकण्याचं काम शरद पवार करत आहेत. पवारांच्या भरवश्यावर ही मशाल सुरू आहे. पण तुमच्या सारखे कार्यकर्ते त्या मशालला संपूर्ण विझविल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक काम करा. लोकांना भावनिक पद्धतीने जिंकावं लागेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला.

आता पूर्वी सारखे दिवस नाहीत. आराम करण्याचे दिवस नाहीत. एक संघर्ष केला. सरकार आलं. आता दुसरा संघर्ष करायचा आहे. भाजपचे 150 आमदार निवडून आणले पाहिजे. 45 खासदार निवडून आणले पाहिजे.

ओबीसी समाजाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असावेत. घरोघरी जा. धन्यवाद मोदीजी म्हणा. नवे कार्यकर्ते जोडा. नव्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा. जेवढेही काँग्रेस राष्ट्रवादीला तोडता येईल तेवढं तोडा, असं आवाहनच त्यांनी केलं.

1 जानेवारी 2023 ही तारीख लक्षात ठेवा. 25 मते प्रत्येक नेत्याने आपल्या मतदार यादीत अॅड करा. तुम्ही टार्गेटचं घेऊन जा. मी तुम्हाला कर्ज मागायला आलोय. 25 मतं प्रत्येक बुथवर टाकायचं आहे.

इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपात आणा. 25 कार्यकर्ते पक्षात आणा. हवा पाहून दिवा लावणारे 25 कार्यकर्ते असतात. त्यांना आपल्याकडे वळवा. एका बुथवर 100 कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. 2100 लोकांच्या घरी जा. तुमची 105 लोकांची कार्यकारिणी आहे. त्यामुळे तुम्ही दोन लाख मतदार तयार करण्याचं टार्गेट ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.

संतोष देशमुख हत्या : घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते...
संतोष देशमुख हत्या : घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते....
विम्याच्या पैशांसाठी मुलाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून
विम्याच्या पैशांसाठी मुलाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून.
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, 'औरंगजेब हा उत्तम...'
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, 'औरंगजेब हा उत्तम...'.
धावत्या बससमोर बाईक, पुढे काय झालं बघा.. तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका
धावत्या बससमोर बाईक, पुढे काय झालं बघा.. तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका.
नांदेड - लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात
नांदेड - लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात.
'पीडितेचा मला फोन, अन्...', वसंत मोरेंसोबत 20 मिनिटं काय झाली चर्चा?
'पीडितेचा मला फोन, अन्...', वसंत मोरेंसोबत 20 मिनिटं काय झाली चर्चा?.
माणसं नाहीतर हैवान... देशमुखांच्या हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर
माणसं नाहीतर हैवान... देशमुखांच्या हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर.
सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या..
सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या...
फडणवीसांच्या भेटीनंतर मुंडे म्हणाले, मला बेल्स पाल्सी.. I Can't speak
फडणवीसांच्या भेटीनंतर मुंडे म्हणाले, मला बेल्स पाल्सी.. I Can't speak.
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली; सांभाजीनगरमध्ये उपचार सुरू
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली; सांभाजीनगरमध्ये उपचार सुरू.