शरद पवारांनी मोदींच्या नादू लागू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा

येणाऱ्या महापालिका निवडणुका देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लढू आणि प्रचंड ताकदीने जिंकू. मुंबईत आमचा महापौर असणार, पुण्यात आमचा महापौर असणार. महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार. कुठलीही निवडणूक येऊ द्या, नंबर एकचा पक्ष आमचाच असणार.

शरद पवारांनी मोदींच्या नादू लागू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 9:13 PM

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. मोदीजींचं कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठं आहे. त्यांना 150 देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघते. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत, अशी खोचक टीका करतानाच शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी (narendra modi) हे खूप मोठे नेते आहेत, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीवरही त्यांनी टीका केली. नितीश कुमार यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीची कृपा आहे. नितीश कुमार यांनी दगाबाजी केली. इकडं उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. तिकडे त्यांनी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

आघाडीची कधीच सत्ता येणार नाही

महाराष्ट्रातील दोनशेच्यावर आमदार आम्ही निवडून आणणार. महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, असं सांगतानाच शरद पवार यांनी मोदीजींच्या नादी लागू नये. कारण ते प्रचंड मोठे नेते झाले आहेत, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज्यभर आमचाच महापौर असणार

येणाऱ्या महापालिका निवडणुका देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लढू आणि प्रचंड ताकदीने जिंकू. मुंबईत आमचा महापौर असणार, पुण्यात आमचा महापौर असणार. महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार. कुठलीही निवडणूक येऊ द्या, नंबर एकचा पक्ष आमचाच असणार. महाविकास आघाडीला हरवत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून महापौरांपर्यंत निवडून येतीलच, असा दावाही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे नैराश्यात

उद्धव ठाकरे नैराश्यात बोलत आहेत. त्यांचे मुख्यमंत्री पद गेलं आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री पद काढून टाकलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.