नागपूर: वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन (Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray). भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच बावनकुळे यांनी हे विधान केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे मोठं विधान केलं. वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, असं विधान बावनकुळे यांनी केलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची काल मुंबईत बैठक पार पडली.
यावेळी भाजपने आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. त्यानंतर लगेचच बावनकुळे यांनी मनसेच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निमित्ताने भाजप आणि मनसे महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का? अशी चर्चाही रंगू लागली आहे.
सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे 82 आणि शिवसेनेचे 84 नगरसेवक आहेत. येत्या पालिका निवडणुकीत शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी होण्याची शक्यता आहे. अशावेळी महापालिकेत सत्ता आणण्याच्या भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आता भाजपने मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. मनसे आणि भाजप एकत्र आल्यास आगामी महापौर भाजपचा आणि उपमहापौर मनसेचा होऊ शकतो, असा अंदाजही राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.
बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोलhttps://t.co/DMafHhFXoC @bb_thorat @cbawankule
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2020
Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray
संबंधित बातम्या :
बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोल
परिवहन विभागाला एका मिनिटात एक हजार कोटी दिले; मग वीजबिल माफी का नाही?; बावनकुळेंचा सवाल