Special Report : शरद पवार भोंदूबाबा, उद्धव ठाकरेंवर जादूटोणा, बावनकुळेंचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलाय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलाय. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “राष्ट्रवादीचा राज्यात बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न होता. तो त्यांनी यशस्वी केला. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा करण्याचा हा प्रकार होता. तो त्यांनी केला. त्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादीने हा जादूटोणा केला होता. म्हणून उद्धव ठाकरे यांचं मन डायव्हर्ट झालं आणि दरवाजे बंद करून ते तिकडे गेले”, अशी टीका बावनकुळेंनी केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून नेमकं कसं उत्तर देण्यात आलंय या विषयी माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !