Kolhapur North By Election Result 2022: चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी? कोल्हापूर उत्तरच्या पराभवानंतर चर्चा तर सुरु

कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपाच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरु लागलीय!

Kolhapur North By Election Result 2022: चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी? कोल्हापूर उत्तरच्या पराभवानंतर चर्चा तर सुरु
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 7:00 PM

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North By Election) काँग्रेसनं भाजपला चारीमुंड्या चीत केलंय. काँग्रेस आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा 18 हजार मतांनी पराभव केलाय. ही पोटनिवडणूक जरी जयश्री जाधव आणि सत्यजीत कदम यांच्यात झाली असली तरी खरा सामना हा महाविकास आघाडीतील नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात होता. मात्र, या सामन्यात आणि कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपाच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरु लागलीय!

चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा भाजपला फटका?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचा फटका भाजपला बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाटील यांना आपली वक्तव्ये भोवण्याची शक्यता असल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये सुरु असल्याचं कळतंय. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. मात्र, हा मुद्दा मतदारांच्या पसंतीला उतरला नसल्याचं दिसून येत आहे.

..तर हिमालयात जाणार या वक्तव्यावरुन खिल्ली

त्याबरोबर पराभव झाला तर मी हिमालयात जाईन असंही एक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पाटलांची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. तसंच पाटलांच्या वक्तव्यावरुन भाजपवरही टोलेबाजी केली जात आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याच्या तारखाच देत आले आहेत. त्यावरुनही महाविकास आघाडीतील नेते आता भाजपवर निशाणा साधताना दिसून येत आहेत.

कोल्हापूरमध्ये भाजपची जोरदार पिछेहाट

मुळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत पाटील यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपला एकही जागा जिंकून देता आली नाही. महापालिका निवडणुकीतही भाजपचा मोठा पराभव झाला. गोकुळ दूध संघ निवडणुकीतही भाजपला फटका बसला. तर आता पार पडलेल्या पोडनिवडणुकीतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं जाणार असल्याची चर्चा आता जोर धरताना दिसत आहे.

इतर बातम्या :

Kolhapur North By Election : कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट! 2019 पासूनचं गणित काय सांगतं?

Aditya Thackeray : अयोध्येला जाणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; तर नवनीत राणा आणि रवी राणांबाबत काय म्हणाले ठाकरे?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.