ओ पोलीस, तुमच्याशी बोलते, संपूर्ण सभा… पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

मला जर काही मागायचं असेल तर देवीला एवढंच सांगेन. मला स्वाभिमानाच्यापोटी जसं जन्माला घातलं. तसंच स्वाभिमानाने मरणाला जाऊ दे, असं त्या म्हणाल्या.

ओ पोलीस, तुमच्याशी बोलते, संपूर्ण सभा... पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
ओ पोलीस, तुमच्याशी बोलते, संपूर्ण सभा... पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 7:12 PM

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांचा दसरा मेळावा (dussehra rally) आज सावरगाव येथे दणक्यात पार पडला. पण या मेळाव्याला गालबोट लागलं. पंकजा मुंडे यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच काही कार्यकर्ते सभेत गोंधळ घालत होते. पंकजा मुंडे यांनी या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहनही केलं. तरीही कार्यकर्ते गोंधळ घालत होते. घोषणा देत होते. त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस (police) आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी हुज्जतही झाली. यावेळी ओ पोलीस. तुमच्याशी बोलते. संपूर्ण सभा शांत आणि शिस्तीत आहे. असं पंकजा म्हणाल्या. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू झालं. मात्र, भाषण संपल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाच. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलिसांनी या गोंधळी कार्यकर्त्यांना बेदम चोप दिल्याने मेळाव्याच्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला दरवर्षी तुफान गर्दी होते. यंदाही या मेळाव्याला तुफान गर्दी झाली. पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या तरुणांना पंकजा मुंडे यांनी खडसावलं. तसेच पोलिसांनाही सबुरीनं घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

ही पूर्ण सभा पोलीस.. पोलीस.. ओ पोलीस मी तुमच्याशी बोलतेय. एक मिनिट. सर्व सभा शांत आणि शिस्तीत आहे. समोरचे पाच सहा पोरं ज्यांनी डोक्याला पंचे बांधले. ते धिंगाणा करायलेत. तुम्ही आमचे असाल तर धिंगाणा करणार नाहीत. पोलिसांनी शांतपणे घेतलंय. तुम्हीही शांतपणे घ्या. हे लाल बांधलेला. सगळेजण शांत बसलेत. समोरच्या पाच मुलांनी माझं भाषण होईपर्यंत हाताची घडी तोंडावर बोट ठेवावं. धिंगाणा करायचं हे स्थान नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला जर काही मागायचं असेल तर देवीला एवढंच सांगेन. मला स्वाभिमानाच्यापोटी जसं जन्माला घातलं. तसंच स्वाभिमानाने मरणाला जाऊ दे, असं त्या म्हणाल्या.

दसऱ्याचा मेळावा आहे. पूर्ण राज्याचं लक्ष आहे. मीडियाही मोठ्या प्रमाणात आला आहे. पंकजाताई काय बोलणार? सभा, मेळावे म्हटलं तर एकमेकांवर टीका होते, चिखलफेक होते. या मेळाव्यात दुसरं काय होणार? ही उत्सुकता लोकांमध्ये आहे. हा चिखल फेकणाऱ्यांचा मेळावा नाही. हा चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. चिखल तुडवणं आणि संघर्ष करणं हे आमच्या रक्तातच आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचं भाषण झाल्यानंतर मेळाव्यात पुन्हा एकदा गोंधळ झाला. काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लाठीचा चांगलाच चोप दिला. त्यामुळे मेळाव्यात गोंधळाचं वातावरण झालं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.