Devendra Fadnavis : सूरतेमधून महाराजांनी खंडणी वसूलण्याच्या जयंत पाटील यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis : पत्रकारांनी विचारलं, सदबुद्धी कोणाला द्यावी अशी प्रार्थना केली. त्यावर फडणवीस म्हणाले की, "बऱ्याच लोकांना सदबुद्धी देण्याची गरज आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. सर्वांना सदबुद्धी द्यावी अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली"
“श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आत्ताच मी घरामध्ये केलीय. गणेशपर्व हे आपल्या महाराष्ट्राच नव्हे, तर आता संपूर्ण देशाच पर्व झालय. या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वाना शुभेच्छा देतो. श्री गणेशाने सर्वाचे दु:ख हरावे, विघ्न दूर करावीत. सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य मिळावे. आपल्या महाराष्ट्राला, देशाला स्थैर्य मिळावं, भरभराट व्हावी, प्रगतीचा वेग वाढावा, अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना केलीय. मला विश्वास आहे की, अतिशय उत्साहाने हे पर्व, गणेशोत्सव देशात, महाराष्ट्रात साजरा होईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी ‘श्री गरणरायाची’ प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंबंधी विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. “नेहमीच मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात. पोलीस सावध आहेत. पोलिसांना सगळ्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी डोळे उघडे ठेवले, तर नागरिकही पोलिसांना मदत करु शकतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘बाप्पाला हे माहित आहेत की…’
निवडणुका आहेत, गणपती बाप्पाकडे काय मागितलं? या प्रश्नावर ते म्हणाले की, “बाप्पाला हे माहित आहेत की, महाराष्ट्रात कोण प्रगती करु शकतं. बाप्पाला मानणाऱ्या महाराष्ट्राच्या नागरिकांनी हे बघितलय. बाप्पाचा आशिर्वाद मिळालाय. बाप्पाकडे मागावं लागत नाही, ते सर्व देतात” पत्रकारांनी विचारलं, सदबुद्धी कोणाला द्यावी अशी प्रार्थना केली. त्यावर फडणवीस म्हणाले की, “बऱ्याच लोकांना सदबुद्धी देण्याची गरज आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. सर्वांना सदबुद्धी द्यावी अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली”
‘हे मी खपवून घेणार नाही’
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर स्वारी केली होती असं तुम्ही म्हणालात, जयंत पाटील म्हणतात की खंडणी वसूल केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं. “ज्यांच्या सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं. त्यांना सर्व ठिकाणी खंडणी दिसते. मला एक गोष्टीच समाधान आहे की, खऱ्या अर्थाने इतिहासाचे अभ्यासक आहेत, शिवरत्न शेट्टे, सदानंद मोरे यांन सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केलीय. माझा एवढच म्हणण आहे की, माझा राजा लुटारु नव्हता. माझ्या राजाला लुटारु म्हणणं मी खपवून घेणार नाही”
‘शेवटी इंग्रजांच्या इतिहासकाराने हे लिहिलय’
पुस्तकातून चुकीचा इतिहास शिकवला जातोय, तो इतिहास बदलणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराजांना लुटारु म्हणणं योग्य नाही. त्यांनी लूट केली नाही. सर्वसामान्यांना त्रास दिलेला नाही. जर इतिहासात चुकीच्या गोष्टी आल्या असतील, तर त्या सुधारल्या पाहिजेत. कारण शेवटी इंग्रजांच्या इतिहासकाराने हे लिहिलय. त्याने हे सर्व वर्णन केलय. इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतून महाराजांना पाहण्याऐवजी आपल्या इतिहासकारांनी सोबत यावं. जिथे कुठे चुकीच असेल ते सुधारलं पाहिजे”