जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच छगन भुजबळ यांचा हल्ला, वेगळा निर्णय का घेतला?; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे. ओबीसी समाज आवश्यक आहे. दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच छगन भुजबळ यांचा हल्ला, वेगळा निर्णय का घेतला?; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 1:20 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली. तसेच वेगळा निर्णय का घेतला? याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली. कायदे आम्हालाही कळतात. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काही कसे करू? आम्ही पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला. सकाळी उठलो आणि निर्णय घेतला आहे असं झालं नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच 2014ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटे शपथविधी का घेतला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

वांद्रे येथील एमईटी मैदानावर अजित पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ बोलत आहेत. यावेळी भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित करत आपल्याच नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. शॉर्ट नोटीसवर सात आठ हजार लोक उपस्थित आहे. 40 हून अधिक आमदारांचं आम्हाला समर्थन आहे. काही आमदार वाटेत आहेत. नव्या दमाने राष्ट्रवादी पक्ष मजबुतीने वाटचाल करणार आहे. काल काही नियुक्त्या झाल्या. परवा काही नियुक्त्या झाल्या. येत्या काही दिवसात अनेक नियुक्त्या होतील, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटलांवर टीका

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका नाही. दोन दोन चार चार महिने सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. शरद पवार यांनी सांगूनही नियुक्त्या होत नव्हत्या. युवक काँग्रेस असो की महिला काँग्रेस असेल तर त्याला नेतृत्व दिल्यावरच काम सुरू होतं. हे सर्व काम थांबलं होतं. सांगूनही काम होत नव्हतं. दादांनी सांगितलं हे काम होत नसेल तर पक्षाची जबाबदारी मी घेतो. दुसऱ्या दिवशी मी सांगितलं. पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे. ओबीसी समाज आवश्यक आहे. दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं. सर्व समाजाला घेऊन पक्ष जात आहे हे चित्र निर्माण व्हायला हवं होतं ते झालं नाही, असं म्हणत भुजबळ यांनी थेट जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला.

घाईघाईने ठरलं नाही

काही महिन्यांपासून वेगळा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 1999मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. महाराष्ट्राचं अध्यक्षपद माझ्याकडे होते. समीर, पंकज त्यांचे सहकारी राबत होते. शिवाजी पार्कवर सभा होती. या सर्वांचं नियोजन त्यांनी केलं होतं. आज जेव्हा परत एकदा पक्षाला भरारी घ्यायची आहे, त्यावेळी सर्व मंडळी झोपलेली नाही. घाईघाईने ठरलं आणि सर्व व्यवस्था झाली असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.