Chhagan Bhujbal : दीपक केसरकरांच्या भूमिकेचे छगन भुजबळांकडून कौतुक, माफियासारखे शब्द वापरू नये अशी अपेक्षा
छगन भुजबळ यांच्यावर एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार आरोप करत होते. त्यानुसार, भुजबळ यांनी बाळासाहेबांना आतमध्ये टाकले होते. परंतु, या सर्व गोष्टींची आठवण आज छगन भुजबळ यांनी करून दिली. शिनसेनेचे जुने दिवस कसे होते, याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
मुंबई : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी माफिया सीएम रिप्लेस केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यात माफिया सीएम हे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना संबोधून म्हटले होते. यावर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माफियासारखी शब्द वापरू नका, अशी विनंती भाजपला करणार असल्याचं सांगितलं. यावर छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केलं. शिवसेनेपासून (Shiv Sena) दूर गेलेले आमदार असं बोलले. यामुळं मला खूप बरं वाटलं. अशा स्तराला जाऊन कोणी बोलू नये, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. बांठिया आयोगाचे बरेचसे काम झाले आहे. आता शिंदे आणि फडणवीस यांनी हे काम पुढं न्यावं, अशी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ
उद्धव ठाकरे गटापासून शिंदे गट का दुरावले
छगन भुजबळ यांच्यावर एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार आरोप करत होते. त्यानुसार, भुजबळ यांनी बाळासाहेबांना आतमध्ये टाकले होते. परंतु, या सर्व गोष्टींची आठवण आज छगन भुजबळ यांनी करून दिली. शिनसेनेचे जुने दिवस कसे होते, याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. भुजबळ म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पण, या सगळ्या चर्चेत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर का गेलो. दुसऱ्या गटात सामील का झालो, याची काही कारण सांगितली जातात. त्यात छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक केली. त्यांच्या शेजारी तुम्ही कसे काय जाऊन बसता. असा प्रश्न ठाकरे यांना शिंदे गटाची आमदार विचारतात. या सगळ्या गोष्टी घडून बरीच वर्षे झालीत.
मंडल आयोगावरून बाळासाहेबांशी मतभेद
नवीन शिवसैनिकांनी किंवा काही आमदारांना माहीत नसेल. उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर का गेलो याची कारण बंडखोर देताहेत. बंडखोर आमदारांची कारण सतत बदलत आहेत. मंडल आयोगावरून माझे आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले. 18 आमदार आम्ही बाहेर पडलो. त्यावेळी शिवसेना ब गट तयार झाला. परत सहा शिवसेनेत गेले. 12 आमदार वेगळे झालो. शिवसेना स्थापन झाली. तेव्हापासून मी सहभागी झालो. मुंबईत शाखा प्रमुख झालो. पहिला महापौर, आमदार मी झालो होतो. मार खावा लागला. अशा बऱ्याच जुन्या आठवणींमध्य भुजबळ आज रमताना दिसले. पण, बाळासाहेबांना शेवटच्या वेळी मी, अमिताभ बच्चन आणि एखादं-दुसरे असे मोजके लोकं भेटायला गेलो होतो, याचीही आठवण त्यांनी करून दिली.