नाशिकच्या पालिका कामगारांना सातवा वेतन आयोग, भुजबळांचं आश्वासन; निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. (chhagan bhujbal assurance to Nashik Municipal Corporation workers for 7th Pay Commission )
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘सातवा वेतन आयोगातील तांत्रिक अडचणी दूर करtन लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आयोग लागू करण्यात येणार’ असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड इथल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाचा अभ्यास करून नाशिक इथल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तसंच सातवा वेतन आयोग हा शासकीय वेतनश्रेणीनुसार लागू होणार आहे. वेतन आयोग लागू होतांना कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षित केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बैठकित दिली. (chhagan bhujbal assurance to Nashik Municipal Corporation workers for 7th Pay Commission )
संबंधित बातम्या –
खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही : रावसाहेब दानवे
भाजपसोबत युती करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेतील; मनसेने वाढवला युतीचा सस्पेन्स
(chhagan bhujbal assurance to Nashik Municipal Corporation workers for 7th Pay Commission )