शाई फेकून कोणी मरतं का? शाईफेकीवर भुजबळांचा टोला, चंद्रकांत पाटील यांनी असं दिलं उत्तर

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. यावर छगन भुजबळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

शाई फेकून कोणी मरतं का? शाईफेकीवर भुजबळांचा टोला, चंद्रकांत पाटील यांनी असं दिलं उत्तर
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 6:26 PM

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पिपंरीमध्ये शनिवारी शाईफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर अनेक नेत्याची याचा निषेध व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत असलेल्या 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शाईफेकीवर बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर (Case file against 14 NCP workers) बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणावर छगन भुजबळ (Chhagarn Bhujbal) यांनी सरकारला चिमटा काढण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर खोचक टीका केली आहे. ‘शाई फेकून कोण मरतं का?, ते पण चंद्रकांत पाटलांसारखा भारदस्त व्यक्ती.’ आरोपीवर 307 गुन्हा दाखल केल्याने छगन भुजबळांनी हा टोला लगावला आहे.

‘एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, माझ्या डोळ्याला कँन्सर झाला होता. स्कीरा रेटीनाचा प्रॉब्लेम आहे. हा हल्ला माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न होता का ? त्याच डोळ्यावर शाई कशी फेकली. त्यांना माहिती होतं का ? माझ्या डॉक्टरांनी मला फोन केला आणि सांगितलं आताच्या आता या. मी कार्यक्रम करून रात्री 12 ला गेलो तेव्हा त्यांनी डोळा साफ केला. हा भ्याड हल्ला आहे.’

‘राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं मात्र त्यांना पोलिसांनी अटक केली हे लोकशाही मार्गानं केलं. पोलिसांनी जी कलमं लावली हा त्यांचा विषय आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. आज शाई फेकली उद्या दुसरं काहीतरी करतील.’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या या शाईफेकीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माफी मागितल्यानंतर ही असा हल्ला करणे चुकीचं असल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.