छगन भुजबळांचं स्वत:चंच मत हुकलं!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आज (21 ऑक्टोबर) सर्वच नेत्यांनी सकाळी पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क (Right and Responsibility of Voting) बजावला आणि मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं.

छगन भुजबळांचं स्वत:चंच मत हुकलं!
Chhagan bhujabal
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 10:01 PM

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आज (21 ऑक्टोबर) मतदान झालं. सर्वच नेत्यांनी सकाळी पहिल्यांदा मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क (Right and Responsibility of Voting) बजावला आणि मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, याला छगन भुजबळ अपवाद ठरले आहेत. भुजबळ दिवसभर आपल्या मतदारसंघात फिरत प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. मतदारसंघात मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत आणि अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्न करत होते. मात्र, स्वतः भुजबळांनी मतदान न केल्याने (Chhagan Bhujbal did not vote) राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मतदान न केल्याबद्दल विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, “मी स्वतः उमेदवार असल्यामुळे मतदारसंघात फिरत होतो. माझा मतदारसंघ उभा-आडवा प्रचंड मोठा आहे. मी सकाळी निघून फिरण्यास सुरुवात केली, तरिही सायंकाळपर्यंत संपूर्ण मतदारसंघात पोहचू शकलेलो नाही. त्यामुळे मी मतदान करु शकलो नाही.”

एक्झिट पोल काहीही येवोत मी माझ्या येवला मतदारसंघातून 1 लाख मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “नाशिकमध्ये मी जास्तीत जास्त फिरलो. नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 उमेदवारांपैकी 12 जागा तरी आम्हाला कमीत कमी मिळतील. यावेळी निश्चितपणे सरकार बदलेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे.”

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यापासून शरद पवारांवरील ईडीची कारवाई या गोष्टी लोकांना आवडलेलं नाही. याविषयी जनतेत संताप आहे. हा संताप आज मतदानाच्या स्वरुपात मतपेटीत बंद झाला आहे. 24 ऑक्टोबरला निकालाच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचेच सरकार येईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

येवला-लासलगाव मतदारसंघात मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह आहे. अनेक गावांमध्ये 75 ते 80 टक्के मतदान झाल्याचंही भुजबळांनी नमूद केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.