छगन भुजबळ म्हणतात, ‘संभाजी राजेंनी उपोषणाला बसू नये, यंत्रणांचा दबाव राज्यात वाढतो आहे हे तुम्हीच सांगता आहात’
मुंबईतल्या आझाद मैदानात राज्याभरातून अनेक कार्यकर्ते आले असून आझाद मैदान परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे उपोषण अत्यंत शांततेच्या मार्गाने सहभागी झालेल्या लोकांनी कराव असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे.
मुंबई – आरक्षणासह मराठा (maratha) समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje chhatrapati) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ते मुंबईतील (mumbai) आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत, त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असल्याने त्यांना उपोषणाला बसायला उत्साह आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी त्यांना आंदोलन करू नका यासाठी फोन केले होते. परंतु आम्ही कुठवर शांत बसायचं अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. तसेच “संभाजी राजेंनी संभाजी राजेंना उपोषणाला बसू नये, सरकार तुमच्या बाजूने आहे याचा विसर पडू देऊ नका. यंत्रणांचा दबाव राज्यात वाढतो आहे हे तुम्हीच सांगता आहात, तसेच युक्रेनमध्ये नाशिकच्या अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असं सांगितलं आहे. दोन दिवसात महाविकास आघाडी अनेक नेत्यांनी त्यांना उपोषणाला बसू नका म्हणून फोन केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यंत्रणांचा दबाव राज्यात वाढतो आहे हे तुम्हीच सांगता आहात
आत्तापर्यंत सरकारकडून आम्हाला फक्त आश्वासन मिळत राहिली आहेत, त्याचबरोबर सरकारकडून कोणतीही कठोर भूमिका घेतली जात नसल्याचं समजतंय त्यामुळे मी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती किती दबाव वाढतोय हे देखील खासदार संभाजीराजे छत्रपती यांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण करू नये अशी भूमिका छगन भूजबळ यांची आहे. आमचं सरकार तुमच्या बाजूने आहे असंही छगन भूजबळ म्हणाले आहेत. राज्यभरातून अनेक संघटनांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठींबा दर्शविला आहे.
युवकांचा उपोषणाला अधिक प्रतिसाद
मुंबईतल्या आझाद मैदानात राज्याभरातून अनेक कार्यकर्ते आले असून आझाद मैदान परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे उपोषण अत्यंत शांततेच्या मार्गाने सहभागी झालेल्या लोकांनी कराव असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला अनेक युवकांनी पाठिंबा दर्शविला असून मराठा समाजाच्या अत्यंत किरकोळ मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्या असंही त्यांनी सांगितलं आहे. आत्तापर्यंत आम्हाला सरकारकडून फक्त आश्वासनं मिळाली आहेत, त्यामुळे आम्हाला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला. मराठा समाज्याचे अनेक नेते उपोषणस्थळी भेट देणार असून त्यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुध्दा उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेणार आहेत.