Bihar Election Result ! भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका, मोदींचा करिश्मा राहिला नाही; भुजबळांची फटकेबाजी

बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. (chhagan bhujbal slams bjp and pm narendra modi over bihar election)

Bihar Election Result ! भाजपच्या 'त्या' प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका, मोदींचा करिश्मा राहिला नाही; भुजबळांची फटकेबाजी
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:44 AM

नाशिक: बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला लगावतानाच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे या भाजपच्या प्रयोगामुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा फटका बसल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. (chhagan bhujbal slams bjp and pm narendra modi over bihar election)

‘टीव्ही 9 मराठी’ संवाद साधताना छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली. प्रत्येक राज्यात एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि त्याच पक्षाला नंतर संपवायचं हा भाजपचा नेहमीचा प्रयोग राहिला आहे. महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेची साथ घेतली. भाजपला महाराष्ट्रात कोणीही विचारत नव्हतं. त्यांच्या एकदोन जागा यायच्या. आज परिस्थिती पाहतच आहोत. तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. त्याचाच फटका नितीशकुमार यांना बसला आहे, असा दावा भुजबळांनी केला.

बिहार निवडणुकीचे कल पाहिले तर भाजपची पहिल्यासारखी लाट राहिलेली दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाटही राहिली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी भुजबळ यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक केलं. समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, संपूर्ण भाजपा आणि त्यांचे मंत्री असतानाही तेजस्वी यादव यांनी कडवी टक्कर दिली. वडील तुरुंगात असूनही त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष पुढे नेला त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. तेजस्वी यांचं सरकार येवो अगर न येवो पण त्यांचं अभिनंदन करायलाच हवं, असंही ते म्हणाले.

कोरोनामुळे सत्ता गेली

दरम्यान, जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी कोरोनामुळे आमची सत्ता गेली असा दावा केला आहे. आम्हाला आमचा पराभव मान्य आहे. आम्हाला नैसर्गिक आपत्तीने पराभूत केलं आहे. नितीशकुमार नावाचा ब्रँड बिहारमधून गायब झालेला नाही आणि तेजस्वी यादवही नेते म्हणून इस्टॅब्लिश झालेले नाहीत. कोरोनामुळे लोकांची नकारात्मक मानसिकता तयार झाली. त्यामुळे आमचा पराभव झाला. राजदमुळे नाही, असं त्यागी म्हणाले.

दरम्यान, बिहार निवडणुकीचे कल हाती येत असून सध्या तरी एनडीएने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. एनडीए 123 जागांवर आघाडीवर असून महाआघाडी 110 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. मात्र, असं असलं तरी राजदला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहे. राजद 72 आणि भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीयू 49 जागांवर आघाडी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. काँग्रेसनेही 27 जागांवर आघाडी घेतली असून लोजपाने 7 जागांवर आघाडी घेतली आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election Results 2020: ‘एनडीए’चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारमध्ये NDA ची मुसंडी, महागठबंधन पिछाडीवर

Bihar Election Result ! तेजस्वी यादवांमुळे नव्हे, कोरोनामुळे आमचा पराभव; जेडीयूचं अजब तर्कट

(chhagan bhujbal slams bjp and pm narendra modi over bihar election)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.