AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : अध्यक्ष महोदय, पकडलेल्या डासांपैकी नर आणि मादी डास किती?; छगन भुजबळांचा विधानसभेत मिश्किल सवाल

Chhagan Bhujbal : पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली, याचे लेखी उत्तर सरकारने दिले. त्यात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर दिले होते.

Chhagan Bhujbal : अध्यक्ष महोदय, पकडलेल्या डासांपैकी नर आणि मादी डास किती?; छगन भुजबळांचा विधानसभेत मिश्किल सवाल
अध्यक्ष महोदय, पकडलेल्या डासांपैकी नर आणि मादी डास किती?; छगन भुजबळांचा विधानसभेत मिश्किल सवालImage Credit source: vidhansabha
| Updated on: Aug 22, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आरोग्य खात्याच्या एका विषयावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांच्यावर मिश्किल टोलेबाजी केली. किटक संहाराकाच्या मार्फत कार्यक्षेत्रातील डास पकडून त्याचे वर्गीकरण करणे, डास घनता काढणे, डासांचे विच्छेदन करणे असा विषय आरोग्य खात्याने पटलावर ठेवला होता. भुजबळांनी या विषयावरून आरोग्य खात्याची पिसेच काढली. आधी भुजबळांनी हा विषय वाचून दाखवला. त्यानंतर हे काम अतिशय चांगलं असल्याचा टोमणा मारला. अध्यक्ष महोदय. आतापर्यंत किती डास पकडले? हा माझा प्रश्न आहे. या सर्व डासांचं विच्छेदन केल्यावर त्यात किती नर आणि मादी डास आढळून आले. त्या विच्छेदनातून अतिशय संहारक डास कोणता आहे? मादी डास आहे की नर डास आहे? त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का?, असा मिश्किल सवाल छगन भुजबळ यांनी विधानसभेत (vidhansabha) करताच एकच खसखस पिकली.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली, याचे लेखी उत्तर सरकारने दिले. त्यात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर दिले होते. यावर प्रश्न विचारताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहे की मादी डास धोकादायक आहे. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का .? असे गंमतीशीर प्रश्न विचारून आरोग्य खात्याच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढले.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला लवकरच सुप्रमा

दरम्यान, भुजबळ यांनी विधानसभेत उर्ध्व गोदावरी प्रकल्पावरही विधानसभेत प्रश्न विचारले. उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ सूप्रमा मिळावी यासाठी माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ गेली अनेक दिवस पाठपुरावा करत होते आज याबाबत अधिवेशनात नियम 105 अन्वये लक्षवेधी उपस्थित केला. त्यांनी पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या मांजरपाडा (देवसाने) या राज्यासाठी पथदर्शी असलेल्या योजनेचा समावेश ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये (UGP) होतो. या ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामधील मांजरपाडा सह काही वळण योजना आणि कालव्यांची कामे निधी अभावी अपूर्ण अवस्थेत आहेत. या उर्ध्व गोदावरी प्रकल्प अहवालास चतुर्थ सुप्रमा मिळावी अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना महिनाभरात या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, अशी माहिती उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

परिस्थिती काय?

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा प्रस्ताव मार्च 2021मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समिती (SLTAC) कडून शासनास सादर झाला आहे. या प्रस्तावावर 24 फेब्रुवारी 2022 रोजीच्या व्यय्य अग्रक्रम समिती बैठकीत चर्चा होऊन हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णयसुद्धा EPC च्या बैठकीत झालेला आहे. ही फाईल कॅबिनेट मध्ये विषय घेण्यासाठी मुख्य सचिवांकडे गेली असतांना त्यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेण्यासाठी SLTAC च्या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने 4 ऑगस्ट च्या रोजी राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा क्लिअरन्स प्राप्त करून राज्य मंत्रीमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे.

या प्रलंबित सुप्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा(देवसाने), धोंडाळपाडा, ननाशी, गोळशी महाजेयासह पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे पूर्ण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पुणेगाव-दरसवाडी,दरसवाडी- डोंगरगाव कालवा विस्तारीकरण व कॉक्रीटीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी सदर प्रकल्पाला सुप्रमा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे उर्ध्व गोदावरी प्रकल्प अहवालास सुप्रमा मिळणेसाठी या विषयाला लवकरात लवकर राज्यमंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात यावी आणि या प्रकल्पाला सुप्रमा मिळावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती.

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.