मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, छगन भुजबळ संतापले; कारवाईची मागणी

भिडेंबरोबर जाणं हे आत्मघातकी आहे. राजकारणाच्या दृष्टीनेही. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातील जनता सहन करणार नाहीच पण गुजरातमधील कोणताही गुजराती बांधव हे सहन करणार नाही.

मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, छगन भुजबळ संतापले; कारवाईची मागणी
sambhaji bhideImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 2:46 PM

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 30 जुलै 2023 : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यावरून राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्या निषेधार्थ निदर्शनेही केली आहेत. आता या वादात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. त्या मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भिडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

छगन भुजबळ मीडियाशी संवाद साधत होते. संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट आहे. खरे म्हणजे तो मनोहर भिडे. त्याच्यावर आम्हीही एक केस दाखल केली आहे. आमच्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल हे जे काही विधान आहे, त्यावर आमची केस आहे. पण कोर्टात ती केस पुढे पुढे ढकलली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोर्टात गेलो. तारीखच लागत नाही. शेवटी काय सरकार फक्त केस करणार. पण केस केल्यावर ती पटकन वर आली पाहिजे. पण तारखावर तारखा पडत असतात. मला कधी कधी वाटतं त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही तेच समजत नाही. त्या मनोहर भिड्यांचं, असं छगन भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अशा लोकांवर कडक कारवाई करा

महात्मा फुलेंवर ते टीका करतात, पण महात्मा गांधींवरही ते टीका करतात. ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ टीका करतात. माझी खात्री आहे, पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शाह असतील कुणालाही ते आवडणार नाही. महात्मा गांधींवरील टीका कुणीही सहन करणार नाही. महात्मा गांधींना आज अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो. क्वचित एखादा देश असेल तिथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. जिथे तिथे महात्मा गांधींच्या विचारसरणीला मानलं जातं. आपलसं केलं जातं. अन् इकडे महात्मा गांधींवर गलिच्छ स्वरुपाच्या टीका केल्या जातात. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

त्यांच्यासोबत जाणं आत्मघातकी

भिडेंबरोबर जाणं हे आत्मघातकी आहे. राजकारणाच्या दृष्टीनेही. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातील जनता सहन करणार नाहीच पण गुजरातमधील कोणताही गुजराती बांधव हे सहन करणार नाही. मोदी आणि शाहही सहन करणार नाही. भिडेंवर कारवाई कडक होत नाही म्हणून ते वाट्टेल ते रोज रोज नवीन नवीन काही तरी बोलतात, असं त्यांनी सांगितलं.

स्तुती नको, पण टीका तरी का?

आता पंडित नेहरूंबद्दल बोलले. नेहरुंचं देशासाठी काडीचंही योगदान नाही असं म्हणतात. अरे त्यांचे वडील देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. सर्व दिलं त्यांनी या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. स्वत: साडे अकरा वर्ष नेहरु तुरंगात राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळेल की नाही हे तेव्हा माहीत नव्हतं.

ते असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस, लाला लजतपराय असतील, टिळक असतील ही सर्व मंडळी लढत होती. त्यावेळी ते देशासाठी लढले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल. फार फार त्यांची भलामण करू नका. त्यांची स्तुती करू नका. पण असले काही तरी आरोप करू नका. मला तरी ते आवडत नाही आणि पसंत नाही, असं भुजबळ म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.