देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या: छगन भुजबळ
पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. (chhagan bhujbal taunts BJP over West Bengal Election)
नाशिक: पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. मेरा बंगाल नहीं दूंगी म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या, असं सांगतानाच बंगालच्या निकालानंतर देशात भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. (chhagan bhujbal taunts BJP over West Bengal Election)
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं तोंडभरून कौतुक केलं. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या. मै अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या. त्याच प्रमाणे ममता दीदीही मै अपना बंगाल नही दुंगी म्हणत लढल्या. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे 8 ते 10 मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.
त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही
आसाम वगळता भाजपला कुठेच यश मिळाले नाही. भाजप विरोधात देशात प्रचंड लाट तयार झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. पंढरपूरचा निकाल गटतट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे. त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असंही ते म्हणाले.
पश्चिम बंगालची स्थिती काय
आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.
शरद पवारांकडून अभिनंदन
“या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात” असे ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणाऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (chhagan bhujbal taunts BJP over West Bengal Election)
VIDEO : Election Results 2021 Live : तृणमूलला बहुमतासाठी 7 जागांची गरज#Pandharpurbyelections #PandharpurElectionResults #AssemblyElections2021 #TamilNaduElections2021 #WestBengalElections2021 #AssamPolls2021 #Keralaelections #PuducherryElections2021 pic.twitter.com/vQEQEPw4Es
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
संबंधित बातम्या:
पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींपुढे मोदी-शाहांचा करिष्मा फेल, तृणमूल काँग्रेसला 203 जागांवर आघाडी
पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत
(chhagan bhujbal taunts BJP over West Bengal Election)