दादा आणि ताईसाठी बारामतीचा जीव टांगणीला, बड्या नेत्याची उडी; अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांना आवाहन काय?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाऊबीजेसाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार का? अशी चर्चा सध्या बारामतीत रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. बारामतीच्या निवडणुकीवर आणि अमित ठाकरे यांच्या पाठिंब्यावरही त्यांनी मत व्यक्त केले.

दादा आणि ताईसाठी बारामतीचा जीव टांगणीला, बड्या नेत्याची उडी; अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांना आवाहन काय?
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 12:37 PM

भाऊबीजेचा आज सण असल्याने संपूर्ण राज्याच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाऊबीज सण आला आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज भाऊबीज साजरी करणार का? अजितदादा आज गोविंदबागेत येणार का? अशी चर्चा रंगली आहे. आज सकाळीच अजितदादांनी गोविंदबागेत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, दिवसभरात काहीही घडू शकतं असं वाटत असल्याने बारामतीकरांचा जीव टांगणीला लागला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यात उडी घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी हे आवाहन केलं आहे. बारामतीत थोडी तणातणी आहे. पण दादा आणि ताईंनी संध्याकाळपर्यंत एकत्र यावं. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ. संध्याकाळपर्यंत एकत्र आले नाही तर निदान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला त्यांनी एकत्र आले पाहिजे. राजकीय विचार काही असू शकतात. शरद पवार साहेब म्हणाले, कुटुंब फुटू देणार नाही. त्याचा विचार दोघांनीही करावा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मतदार ठरवतील

बारामतीच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. विरोधी पक्षातील नेते अजितदादा यांना निवडणूक सोपी आहे असं बोलणार का? असा सवाल करतानाच 18 तारखेपर्यंत हे सगळे असे बोलणारच. 5 तारखेपासून प्रचाराची धार वाढेल. मतदार ठरवतील कुणाला जिंकून आणायचे, असं भुजबळ म्हणाले.

मुंबईतील नेते ठरवतील

अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उलटेसुलटे विधानं येत असतात. मुख्यमंत्री पण बोलले माझ्यासोबत काही चर्चा झालेली नाही. आता मुंबईतील नेते यासंदर्भात निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझ्यामुळे तुम्ही पुढे आला

यावेळी छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच फटकारलं आहे. आव्हाड यांनी अजितदादांबाबत अपशब्द वापरले होते.त्यावरून भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. मला जितेंद्र आव्हाडांना सांगायचं आहे की, यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळा चुकीच्या शब्दांचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यानं अडचणीत आला आहात हे लक्षात ठेवा. माझा सल्ला राहील. मानायचा की नाही ते पाहावं. पण शब्द कोणते वापरावे याचा विचार केला पाहिजे. विचारपूर्वक बोललं पाहिजे. कुणाला चोर म्हणतो, कुणाल पाकिट मार म्हणतो ते पाहावं. जे 20-20 आणि 25-25 वर्ष तुमच्यासोबत राहिले त्या सर्वांना तुमचे हे बोल लागू होतात. मला वाटतं की एवढ्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांना पुढे आणण्यात पवारांचा हात आहे. तसा भुजबळांचाही आहे. हे त्यांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही सर्वांना विशेषण लावतात ते दु:ख वाटतं. त्यांनी सांभाळून बोलावं, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.