राजू शिंदेंसह तब्बल 18 जण करणार भाजपला रामराम, ठाकरे गटात करणार प्रवेश, पाहा यादी

भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजू शिंदेंसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे.

राजू शिंदेंसह तब्बल 18 जण करणार भाजपला रामराम, ठाकरे गटात करणार प्रवेश, पाहा यादी
राजू शिंदेंसह हे नेते करणार ठाकरे गटात प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 10:13 AM

Raju Shinde Join Thackeray Group : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे राजू शिंदेंसह तब्बल 18 जण भाजपला सोडचिठ्ठी देणार आहे.

ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची यादी समोर

भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही पाहायला मिळाले. मात्र राजू शिंदेंनी आता या गोष्टीला उशीर झालाय असे वरिष्ठांना सांगितले होते. आता राजू शिंदेंसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

राजू शिंदे हे 6 नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काही पदाधिकारीही ठाकरे गटात सहभागी होणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

राजू शिंदेंसह ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची नावे

1) राजू शिंदे (माजी उपमहापौर भाजप) 2) गोकुळ मलके (नगरसेवक भाजप) 3) प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप) 4) अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी) 5) प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष) 6) रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) 7) सय्यद कलीम (जिल्हा परिषद सदस्य शिंदे गट) 8) सतीश पाटील (पंचायत समिती सदस्य भाजप) 9) संभाजी चौधरी (ग्रामपंचायत सदस्य भाजप) 10) वसंत प्रधान (भाजप जिल्हा उपाध्यक्ष) 11) माया पाटील ( ग्रामपंचायत सदस्य) 12) शंकर म्हात्रे (भाजप मंडळ अध्यक्ष) 13) कैलास वाणी 14) प्रवीण कुलकर्णी 15) अभिजित पवार तालुका अध्यक्ष भाजप 16) मयूर चोरडिया, 17) सौरभ शिंदे 18) आकाश पवार

राजू शिंदे यांची ठाकरे गटात जाण्यापूर्वीची प्रतिक्रिया

“भाजपमध्ये मंडळ अध्यक्ष हा सर्वात मोठा असतो. माझ्यासोबत पाच मंडळ अध्यक्ष आहेत. त्यासोबतच तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि पश्चिम विधानसभेची भाजपची कोअर टीम ही माझ्यासोबत आहेत. हे सर्व माझ्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यामुळेच मी हे निर्णय घ्यायला तयार झालो”, असे राजू शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.