“अयोध्या पोळ यांना एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, आमचे 50 जण असते तरी पुरून उरले असते”

Ambadas Danve on Ayodhya Pol : अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण; ठाकरे गटाच्या नेत्याचा शाब्दिक हल्ला

अयोध्या पोळ यांना एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, आमचे 50 जण असते तरी पुरून उरले असते
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 12:16 PM

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. तसंच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. हे सगळं काल संध्याकाळी हे सगळं प्रकरण घडलं. ठाण्यातील कळवा भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. यावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण आहे. अयोध्या पोळ ही आणखी त्वेषाने लढेल. एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते, असं अंबादास दानवे म्हणालेत.

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये प्रचंड जागा नगरपालिका वापरून ताब्यात घेतल्या आहेत. नगरपरिषद सीईओ अब्दुल सत्तार यांच्याकडे चाप्रशाचा काम करत आहे. चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यासाठी अनेक खटाटोप अब्दुल सत्तार यांनी केली. आताचे आयुक्त अब्दुल सत्तार यांना भीक घालत आहेत. पण त्यांना कायद्यात राहून काम करावे लागेल. कृषी आयुक्त या प्रकरणाची काय चौकशी करणार? कृषी पथकाची चौकशी ही पोलिसांमार्फत झाली पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. अनेक इच्छुक आहेत भाजप आणि शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तार नको आहे. दिल्लीत दर महिन्याला पातशहाला मुजरा करण्यासाठी मुख्यमंत्री जात असावेत, असं ते म्हणालेत.

राज्यात दंगली घडवण्याचे काम सुरू आहे. धार्मिक सलोखा बिघडण्याला सरकारचा पाठिंबा आहे का असा स्थिती असल्यामुळे जयंत पाटील यांनी पत्र लिहिलं आहे, असं म्हणत सध्या राज्यात सुरू असलेल्या धार्मिक दंगलींवर भाष्य केलंय.

निधी हा जनतेचा अधिकार आहे, मुख्यमंत्री आमदारांना घरची प्रॉपर्टी लिहून देत नाहीत तो आमदारांचा अधिकार आहे, निधी दिला तरी अधिवेशन वादळी ठरेल, असंही दानवे म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.