Chandrakant Khaire : महायुतीचे XXX साले, 4 तारखेनंतर कसे फिरतात बघतो, चंद्रकांत खैरेंची चिथावणीखोर भाषा, Video

Chandrakant Khaire : संभाजीनगरच्या क्रांती चौकात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आज आमने-सामने आलेत. यावेळी जोरदार राडा झाला. यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. बोलताना त्यांच्या शब्दांमधून राग दिसत होता. त्यांनी प्रचंड आक्रमक भाषा केली.

Chandrakant Khaire : महायुतीचे XXX साले, 4 तारखेनंतर कसे फिरतात बघतो, चंद्रकांत खैरेंची चिथावणीखोर भाषा, Video
Chandrakant Khaire
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 1:41 PM

“महायुतीचे XXX साले. पैसा खाऊन एकनाथ शिंदेंच्या पाठिशी जातात. 4 तारखेनंतर दाखवून देतो, बघतो संभाजीनगरमध्ये कसे फिरतात?” महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची ही आक्रमक भाषा आहे. आज संभाजीनगरच्या क्रांती चौकात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी राडा झाला. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे प्रचंड संतापले होते. मीडियासमोर बोलताना त्यांचा तोल ढासळला. “महायुतीवाले दारुवाला, पैसे देऊन आला. आम्हाला डिवचलं, तर बरोबर करु, पैसा खातात. आम्ही सरळ करु. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. माझ्यामुळे आमदार झाला, आज मस्ती आली” अशा शब्दात त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली.

“वाद झाल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला पळवून लावलं. हाणामारी झाली पाहिजे असं तुम्हाल वाटत का? या गद्दारांमुळे वातावरण खराब झालय” असं खैरे म्हणाले. निवडणूक कुठल्या दिशेने चाललीय या प्रश्नावर त्यांनी ‘आम्ही जिंकणार’ असं उत्तर दिलं. ‘या गाढवांनी वातावरण खराब केलं आहे’ असं चंद्रकांत खैरे म्हणाले. ‘जे सोबत होते, तेच आज विरोधात’ यावर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

जे लोक तुमच्यासोबत निवडणूक लढवयाचे, तेच लोक आज विरोधात आहेत असं चंद्रकांत खैरे यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “आता शिवसैनिक शांत बसणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत. यांना मस्ती चढलीय, पैसा, दारु, खोकेची मस्ती आहे. जनता आमच्यासोबत आहे. गद्दारांसोबत नाहीय” याआधी तुम्ही इम्तियाज जलील यांच्यावर आगपाखड करायचात, त्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘इम्तियाज जलील यांची बी टीम आहे’

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.