N V Ramana : “मी राजकारणात येण्यास उत्सुक होतो पण…”, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून खंत व्यक्त
Chief Justice N V Ramana : मागच्या काही दिवसांपासून भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा सक्रीय राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. आज स्वत: एन. व्ही. रमणा यांनीच याबाबत खुलासा केला आहे.
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (Chief Justice N V Ramana) सक्रीय राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. आज स्वत: एन. व्ही. रमणा यांनीच याबाबत खुलासा केला आहे. “मी सक्रिय राजकारणात (Active Politics) सामील होण्यास उत्सुक होतो. पण नियतीने वेगळा निर्णय घेतला, म्हणून राजकारणात येणं राहून गेलं”, असं रमणा (N V Ramana) यांनी म्हटलंय. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना रमणा यांनी राजकारण आणि राजकीय पक्ष यावर भाष्य केलं होतं. “लोकशाहीत न्यायसंस्था ही स्वतंत्र संस्था असून संविधानाप्रति बांधिलकी राखणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. मात्र, काही राजकीय पक्षांन वाटते की, न्यायालयाने त्यांची बाजू घ्यायला पाहिजे, त्यांच्या कृतीचे समर्थन केले पाहिजे. पण आमची जबाबदारी केवळ राज्यघटनेप्रति बांधिलकी राखणे आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही” अशा शब्दात देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटलं होतं.
रमणा काय म्हणाले?
“मी सक्रिय राजकारणात सामील होण्यास उत्सुक होतो. पण नियतीने वेगळा निर्णय घेतला, म्हणून राजकारणात येणं राहून गेलं”, असं रमणा यांनी म्हटलंय.
“I was keen to join active politics. But destiny decided otherwise”, Chief Justice of India NV Ramana says in a public lecture.#CJIRamana pic.twitter.com/DLjC9yF4Ww
— Live Law (@LiveLawIndia) July 23, 2022
कोण आहेत न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा?
आंध्र प्रदेशमध्ये 27 ऑगस्ट 1957 रोजी कृष्णा जिल्ह्यातील पुन्नवरम गावात एका शेतकरी कुटुंबात रमणा यांचा जन्म झाला. रमणा यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. रमण यांनी 10 फेब्रुवारी 1983 रोजी वकील म्हणून आपली न्यायालयीन कारकीर्द सुरू केली. 27 जून 2000 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 10 मार्च 2013 ते 20 मे 2013 पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं. रमणा यांची 2 सप्टेंबर 2013 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.17 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहे. त्यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.