सुभाष देसाईंनी नारायण राणेंचं नाव टाळलं!, तर देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी देसाईंनी नारायण राणेंचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

सुभाष देसाईंनी नारायण राणेंचं नाव टाळलं!, तर देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख
चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 1:38 PM

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित झाले होते. यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी देसाईंनी नारायण राणेंचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं. (Subhash Desai avoided mentioning Union Minister Narayan Rane in his speech)

अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होत आहे, असंही देसाई म्हणाले. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विमानतळासाठी लागण्याचा प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करत राहिल्याचं देसाईंनी सांगितलं. चिपी विमानतळाचा द्रोणागिरी उचलण्यासाठी अनेकांचा हातभार लाभला. त्यात मी ही एक बोट लावलं. कोकणाच्या, आपल्या दृष्टीनं हा आनंदाचा सण आपण साजरा करत आहोत. आता कोकणवासियांची सर्व स्वप्न साकार होतील, असंही देसाई यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंकडून राणेंचा उल्लेख

सुभाष देसाई यांच्यानंतर बोलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उभे राहिले. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांचं नाव घेतलं. तसंच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाच्या विकासात हे चिपी विमानतळ एक मैलाचा दगड ठरेल असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलंही नाही

विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरी भी चुप-मेरी भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे जवळपास 16 वर्षांनी एकाच मंचावर येत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्यातलं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं. पण आज कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राणे-ठाकरे आपल्यातल्या वाद बाजूला ठेऊन एकमेकांना बोलतील, चर्चा करतील. कमीत कमी एकमेकांना पाहून नमस्कार तरी करतील, अशी शक्यता होती. पण तसं काहीच झालं नाही.

इतर बातम्या :

NCB नं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? मलिकांनी तिन नावं फोडली, भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

Photo : चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा, नारायण राणेंसह भाजप शिवसेनेचे सर्व नेते एकाच विमानातून मुंबईहून रवाना

Subhash Desai avoided mentioning Union Minister Narayan Rane in his speech

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.