राणे आणि मुख्यमंत्री शेजारी शेजारी बसणार, बातचीत होणार की ‘तुम्ही तिकडे, आम्ही इकडे’?

व्यासपीठावर या दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या आजुबाजूला ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या दोन्ही खुर्च्यांमध्ये अडीच फुटाचं अंतर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर आजुबाजूला असले तरी या नेत्यांच्या मनातील दुरावा मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

राणे आणि मुख्यमंत्री शेजारी शेजारी बसणार, बातचीत होणार की 'तुम्ही तिकडे, आम्ही इकडे'?
चिपी विमानतळ
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 11:29 AM

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा समारंभ काही वेळातच होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही नेते तब्बल 16 वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येणार आहे. व्यासपीठावर या दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या आजुबाजूला ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या दोन्ही खुर्च्यांमध्ये अडीच फुटाचं अंतर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर आजुबाजूला असले तरी या नेत्यांच्या मनातील दुरावा मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. (Narayan Rane and CM Uddhav Thackeray on the same platform)

दरम्यान, नारायण राणे चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना राणे यांनी एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिलाय. व्यासपीठावरील परिस्थिती काय असेल, त्यावर आपलं भाषण अवलंबून असेल, अशा आशयाचं वक्तव्य राणेंनी केलंय. त्याचवेळी उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

बऱ्याच वर्षाने चांगला योग आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकाच व्यासपिठावर येत आहात, याकडेही राणेंचं लक्ष वेधण्यात आलं. ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला, असं राणे म्हणाले. पुन्हा हा योग येईल का? असा सवाल केला असता ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असं सांगून राणेंनी अधिक बोलण्यास नकार दिला. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे जरी एकाच व्यासपीठावर बसलेले पाहायला मिळाले तरी तुम्ही तिकडे, आम्ही इकडे अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

कालच्या पीसीमुळे शिंदेंनी निर्णय बदलला?

चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच काल नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन चिपीचं सर्व श्रेय आमचं असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा चिपी विमानतळाशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तसेच निमंत्रण पत्रिकेत बारीक अक्षरात नाव टाकल्याने नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही म्हटलं होतं. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्ये आपण सीनियर असल्याचं राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानामुळेच शिंदे यांनी आपला निर्णय बदलला असावा असं सांगितलं जात आहे. कार्यक्रमात राणेंकडून मानापमान नाट्य रंगू शकते, असा अंदाज आल्यानेच शिंदे यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावण्याचा निर्णय घेतला असावा असं सूत्रांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! भाजपचा चिपी विमानतळ उद्घाटनावर बहिष्कार, दोन्ही विरोधी पक्षनेते कार्यक्रमाला जाणार नाहीत

NCB च्या मदतीला जाणाऱ्या धडपड्या BJP कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करुन कश्मीरातही जावे : संजय राऊत

Narayan Rane and CM Uddhav Thackeray on the same platform

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.