Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ताई तुमचा अनुभव मोठा, पक्षाला फायदा होईल’, चंद्रकांतदादांचं पत्र, चित्रा वाघ यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. (Chitra Wagh appointed incharge of Maharashtra BJP Yuvati division)

'ताई तुमचा अनुभव मोठा, पक्षाला फायदा होईल', चंद्रकांतदादांचं पत्र, चित्रा वाघ यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी
चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 1:59 PM

मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून चित्रा वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळवलं आहे. (Chitra Wagh appointed incharge of Maharashtra BJP Yuvati division)

चित्रा वाघ यांनी नेतृत्वगुणाची चमक दाखवली

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चित्रा वाघ यांनी जवळपास 20 वर्षे काम केलं. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली. परंतु 2019 च्या  विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही चित्रा वाघ यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तिथेही चित्रा वाघ यांनी आपल्या नेतृत्वगुणाची चमक दाखवली. तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव एका युवतीच्या मृत्य प्रकरणात आल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात चित्रा वाघ यांचा मोठा वाटा राहिला. भाजप नेतृत्व चित्रा वाघ यांच्या कामावर खूश आहे. त्याचमुळे त्यांच्या हाती आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Chitra Wagh (@chitrakwagh)

चंद्रकांत पाटील यांचं चित्रा वाघ यांना पत्र

सस्नेह नमस्कार… भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण ही जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात… गेली अनेक वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात.. युवती व महिला यांच्या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ‘भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी’ म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे… आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल असा मला विश्वास आहे… आपल्या आगामी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा… आपला चंद्रकांत पाटील

पक्षाने दिलली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेन

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे मनस्वी आभार मानले आहेत.

(Chitra Wagh appointed incharge of Maharashtra BJP Yuvati division)

हे ही वाचा :

देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

थोरातांची कन्या म्हणाली, तुमच्या भाषेवरुन संस्काराची ओळख होते, आता पडळकरांचं प्रत्युत्तर

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.