इंग्रजांना परखड सवाल विचारणारे सावरकर लाचार गांधी घराण्याला कळू शकत नाहीत- चित्रा वाघ
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज तीन तास चौकशी झाली. या चौकशीदरम्यान त्यांना 55 प्रश्न विचारण्यात आले. ही चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सावकरकांचा दाखला देत या सगळ्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला […]
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज तीन तास चौकशी झाली. या चौकशीदरम्यान त्यांना 55 प्रश्न विचारण्यात आले. ही चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सावकरकांचा दाखला देत या सगळ्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला आहे.50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली तेव्हा शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला “तुमचे राज्य तरी 50 वर्षे टिकेल काय?, असा सवाल विचारल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर असा परखड सवाल विचारणारे सावरकर आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
चित्रा वाघ यांचा गांधी घराण्यावर हल्लाबोल
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सावकरकांचा दाखला देत गांधी घराण्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला आहे. 50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली तेव्हा शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला “तुमचे राज्य तरी 50 वर्षे टिकेल काय?, असा सवाल विचारल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर असा परखड सवाल विचारणारे सावरकर आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
याशिवाय “राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या? आगे आगे देखो होता है क्या…”, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला”तुमचे राज्य तरी ५० वर्षे टिकेल काय?”असे भर न्यायालयात ठणकावून विचारणारे सावरकर; आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे
राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या आगे आगे देखो होता है क्या.. pic.twitter.com/4mGMlsbvSe
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 13, 2022
राहुल गांधींची चौकशी
राहुल गांधींना त्यांचं नाव, कुटुंब, पत्ता, काम, यंग इंडिया कंपनी कुणाची आहे. त्याची स्थापना कुणी केली. सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचा या कंपनीशी काय संबंध आहे. यंग इंडिया कंपनीमध्ये तुमचे शेअर्स किती आहेत. कंपनीकडे एवढे पैसे कुठून आले? यंग इंडियाला पैसे देणाऱ्यांचा कंपनीशी काय संबंध आहे? या सारखे 55 प्रश्न त्यांना विचारण्यात आले.